नाशिक : महायुतीतील जागा वाटपाचे रहस्य हळूहळू उलगडत असून राष्ट्रवादीने (अजित पवार) विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्याचा मार्ग स्वीकारला आहे. सोमवारी पक्षाने स्थानिक पातळीवरील चार आमदारांना एबी अर्जांचे वाटप केले. यात येवल्यातून छगन भुजबळ, दिंडोरीत नरहरी झिरवळ, कळवण-सुरगाण्यातून नितीन पवार, इगतपुरीत हिरामण खोसकर यांनी हे अर्ज स्वीकारले. निफाडचे दिलीप बनकर, सिन्नरचे माणिक कोकाटे आणि देवळालीतील सरोज अहिरे यांना अर्ज मिळणे अद्याप बाकी आहे. या घटनाक्रमामुळे शिवसेनेला (एकनाथ शिंदे) अजित पवार गटाकडील एकही जागा मिळाली नसल्याचे दिसत आहे.

भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर अजित पवार गटाने सोमवारी जिल्ह्यातील आपले विद्यमान आमदार असणाऱ्या जागांवर थेट एबी अर्ज देण्यास सुरुवात केली. सोमवारी आपल्यासह चार जणांनी हे अर्ज स्वीकारल्याची माहिती नरहरी झिरवळ यांनी दिली. अजित पवार गटाच्या काही जागांवर शिंदे गटाने दावा सांगितला होता मात्र, जागा वाटपात नेमके काय झाले, याची स्पष्टता झालेली नाही. चार आमदारांना एबी अर्ज दिला गेला असताना देवळाली, सिन्नर आणि निफाडचे अर्ज बाकी आहेत. देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आपणास मंगळवारी अर्ज मिळणार असल्याचे सांगितले. तर दिलीप बनकरांनी या अर्जासाठी मुंबईला जाण्याची आवश्यकता नाही, तो स्थानिक पातळीवर मिळणार असल्याचे म्हटले आहे. सिन्नरमधून माणिक कोकाटे यांना एबी अर्ज मिळालेला नाही. या अर्जाबाबत कुठलीही अडचण नसल्याचे कोकाटे यांनी सांगितले.

Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास
Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra Assembly Election Results 2024
वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न
News About Rahul Narwerkar
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरणार? राजकीय वर्तुळात चर्चा काय?
Sharad Pawar group in Thane sent ten thousand postcards to President Draupadi Murmu demanded voting through ballot paper
ठाण्यात शरद पवार गटाने राष्ट्रपतींना पाठविली दहा हजार पोस्टकार्ड; मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची केली मागणी
Apoorva hiray, Ajit Pawar meet Apoorva hiray,
अजित पवार गटात अपूर्व हिरे यांचा प्रवेश ?
Yugendra Pawar
Yugendra Pawar : लाखाच्या फरकाने पराभव, तरीही युगेंद्र पवारांचा मत पडताळणीसाठी अर्ज; म्हणाले, “जर अधिकार असेल…”

हेही वाचा…उमेदवारीसाठी धावाधाव, सर्वपक्षीय मातब्बरांचे मुंबईत ठाण

झिरवळ पिता-पुत्रांच्या वादावर पडदा ?

दिंडोरी मतदारसंघात उमेदवारीवरून राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते तथा विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ आणि शरद पवार गटातील गोकुळ झिरवळ या पिता-पुत्रात निर्माण झालेल्या मतभेदांवर आपणास तिकीट मिळाल्याने पडदा पडल्याचा दावा उपसभापती झिरवळ यांनी केला. या मतदारसंघात गोकुळ यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली होती. या गटाची यादी सायंकाळपर्यंत जाहीर झालेली नव्हती. अद्याप आपण आशावादी असल्याचे गोकुळ यांनी नमूद केले. दुसरीकडे आपला मुलगा आपल्याबरोबर काम करेल. वादाचा कुठलाही विषय राहिला नसल्याचे नरहरी झिरवळ यांनी नमूद केले.

Story img Loader