लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक – रेल्वे प्रवासात प्रवाशांची बॅग चोरणाऱ्या गुन्हेगारास जेरंबद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकला यश आले आहे.

kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त
thane, train, Mumbra-Kalwa,
ठाण्यापल्ल्याडील रेल्वे प्रवास धोक्याचा, मुंब्रा – कळवा दरम्यान दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू
Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा
Mumbai, stolen mobile phones,
मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून देण्यात आलेल्या सुचनेनुसार विविध शाखांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करण्यास सुरूवात केली आहे. मुंबई येथील मेरी अल्वा या भोपाळ येथे रेल्वेने जात असतांना पहाटेच्या सुमारास चोरट्याने त्यांची पर्स लंपास केली. यामध्ये १४ तोळ्याचे दागिने, एक भ्रमणध्वनी असा मुद्देमाल होता. या प्रकरणी नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आणखी वाचा-नाशिक जिल्ह्यातील अपघातात पाच युवकांचा मृत्यू

या गुन्ह्याचा तपास करत असतांना याबाबतची माहिती समाज माध्यमात देण्यात आली होती. गुन्हे शाखा विभाग एकच्या वतीने संशयिताची ओळख पटवण्यात आली. संशयित भारत नगर येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भारत नगरात सापळा रचत संशयित अश्रफ रौफ शेख (१९) याला ताब्यात घेतले. त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेले १४ तोळे दागिने, भ्रमणध्वनी असा आठ लाख, ६५ हजार ९१८ रुपयांचा मुद्देमाल काढून दिला. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संशयिताला ताब्यात घेत नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात दिले.