चाळीस जणांची काळजी तुम्ही करू नका. पहाटेच्या शपथविधीस मीही तुमच्या सोबत होतो. त्यावेळी काय झाले, असा प्रश्न करुन अशा व्यक्तीला आरोप करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे सांगत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना लक्ष्य केले.

हेही वाचा >>> मालेगाव तालुक्यात लुटमारीसह कुटूंबाला मारहाण

सध्या महाविकास आघाडी विरुध्द शिंदे-फडणवीस सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये जनता ४० गद्दारांना धडा शिकवेल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्यानंतर उत्तर देतांना येथे आलेल्या महाजन यांनी त्यांची काळजी तुम्ही करू नका, असा बोचरा सल्ला दिला. पहाटेच्या शपथविधीची आठवण करून दिली. माजी मंत्री अनिल देशमुख यांना भाजपमध्ये यायचे होते. यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र भाजपकडून त्यांना संधी मिळाली नाही. सुदैवाने ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले. गृहमंत्रीपदही मिळाले. मात्र त्या पदाचा गैरवापर करत त्यांनी लाच मागितली. त्यामुळे आता जामिनावर बाहेर असतांना ईडी समोर काय बोलायचे, काय माहिती द्यायची, कागदपत्रे कुठली सादर करायची याचा विचार करा, असा खोचक टोला महाजन यांनी लगावला.

हेही वाचा >>> समाजमाध्यमांत जोर कमी असल्याने भाजप पदाधिकारी चिंतीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे निवडणुका घेण्याविषयी आव्हान देत असले तरी कोणाला वाटले म्हणजे निवडणुका होतात असे नाही. वास्तविक मागील निवडणुकीत ठाकरे यांनी विश्वासघात करत काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत. तुमची ताकद दाखवून द्या, असे आव्हान महाजन यांनी दिले. दोन वर्षापासून करोनामुळे संपर्क होऊ शकला नाही. यंदा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात झाल्याचे प्र-कुलपती या नात्याने महाजन यांनी नमूद केले.