जळगाव : मुंबई ते नाशिक महामार्गावर शहापूरच्या गोठेघरजवळ बुधवारी पहाटे मालमोटारसह इतर वाहने आणि एका खासगी बसचा अपघात झाला. त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये अमळनेर तालुक्यातील दाम्पत्याचा समावेश आहे.

मुंबई महापालिकेत सुरक्षारक्षक असलेले पीयूष सोनवणे (३२) आणि त्यांच्या पत्नी वृंदा सोनवणे (३०) हे दोघे मुलगी कृष्णाली (पाच) हिच्यासह अमळनेर येथे तीन-चार दिवसांपासून आले होते. रविवारी मारवड (ता.अमळनेर) येथे मूळ गावी दहावीच्या वर्गमित्रांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात सहभागी होऊन पीयूष यांनी मंगळवारी पत्नी आणि आई-वडिलांबरोबर संक्रांतीचा सण, मुलगी कृष्णालीचा वाढदिवस साजरा केला होता. त्याच दिवशी रात्री एका खासगी आराम बसने तिघे मुंबईकडे निघाले होते.

हेही वाचा…मिनी सरस प्रदर्शनातून, 52 लाखांची उलाढाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, बुधवारी पहाटे साधारण तीनच्या सुमारास ते प्रवास करत असलेली खासगी बस आणि अन्य मालवाहू वाहनांचा शहापूरच्या गोठेघरजवळ अपघात झाला. अपघातात पीयूष आणि वृंदा सोनवणे या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी कृष्णाली गंभीर जखमी झाली. दोघांवर बुधवारी रात्री मूळ गावी मारवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.