नाशिक – गोदावरीला प्रदुषणमुक्त करण्यासाठी नदीला येऊन मिळणाऱ्या सर्व १९ नाल्यांमधून येणारे दुषित पाणी थांबवून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. नदी किनारी सौंदर्यीकरणासाठी नमामि गोदावरी प्रकल्प अहवाल निर्मितीचे काम तीन महिन्यात पूर्ण होईल. त्या अंतर्गत प्रस्तावित कामे २०२७ च्या सिंहस्थापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.

हेही वाचा >>> महासंघाद्वारे शेतकऱ्यांचा तिसगाव धरणातील पाण्यावर हक्क; थेट जलवाहिनी, ठिबक सिंचनाचा अनोखा प्रकल्प

BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
Mumbai, Redevelopment dispute,
मुंबई : सिंधी निर्वासितांच्या पुनर्विकासाचा वाद न्यायालयात
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव

शहरी नद्यांच्या व्यवस्थापनासाठी धोरणे ठरविणाऱ्या नदीकाठावरील शहराच्या मित्र गटात नाशिकचा समावेश केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र शेखावत यांच्या उपस्थितीत झाला. पुणे येथे सुरू असलेल्या धारा २०२३ बैठकीत देशातील १२ शहरे नदीकाठावरील शहरांच्या मित्र गटाचे सदस्य झाले. त्यात राज्यातील नाशिक आणि नांदेड-वाघाळा या दोन शहरांचा समावेश आहे. देशातील ३० शहरांच्या सहभागातून शहरी नद्यांच्या व्यवस्थापनासाठी २०२१ मध्ये या मित्र गटाची सुरुवात झाली. गेल्यावर्षी ही सदस्यसंख्या ९५ पर्यंत पोहचली आणि आता १०७ शहरे सदस्य झाले आहेत.

हेही वाचा >>> शिवजयंती मिरवणूक : कर्कश ध्वनियंत्रणा, गुलालास मंडळांचा नकार, फलकांवरील मजकूर, छायाचित्रांसाठी परवानगी आवश्यक

यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गोदावरी प्रदूषणमुक्तीचे काम नागरिकांच्या सक्रिय सहभागातून केले जाणार असल्याचे नमूद केले. या कामात नीरी तसेच आयआयटी पवई यांची मदत घेतली जात आहे. दूरगामी परिणाम करणाऱ्या उपाय योजना, आणि नदीकिनारी सौंदर्यीकरण करण्यासाठी नमामि गोदावरी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तीन महिन्यात अहवाल तयार झाल्यानंतर तो जलशक्ती मंत्रालयाकडे सादर करण्यात येईल. त्यातील प्रस्तावित कामे सिंहस्थापूर्वी करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. जलशक्तीमंत्री शेखावत यांनी जल संबंधित क्षेत्रात भारत मोठी गुंतवणूक करीत असल्याचे सांगितले. यात नदी जोडणी, भूजल पुनर्भरण, भूजलाचे नकाशीकरण आदींचा समावेश आहे. सर्व राज्यांसाठी जलधोरण २०४७ हे ध्येय असून, जल सुरक्षा आणि व्यवस्थापन हे आर्थिक विकासाला सुसंगत असेल, असे त्यांनी नमूद केले.