नाशिक – २०२४ या वर्षभरात नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायांविरोधात सहा हजार ८५२ कारवाया केल्या. त्यामाध्यमातून १२ कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. लोकसभा, विधानसभा निवडणुकांवेळी ग्रामीण पोलिसानी अवैध व्यवसायांचा बिमोड करत सराईत गुन्हेगार व समाजविघातक कृत्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या. वर्षभरात ग्रामीण पोलिसांनी सहा हजार ८५२ छापे टाकून ८११० जणांविरुद्ध कारवाई केली. १२ कोटी, सात लाख, ९२ हजार ८९२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच अवैधरित्या अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या २७३ जणांविरुद्ध २०७ गुन्हे दाखल केले. त्यात ५२ देशी बंदुका, ११५ जिवंत काडतुसे, ११२ तलवारी, ३२ कोयते आणि ३५ चाकू हस्तगत करण्यात आले.

हेही वाचा – नाशिक : आंदोलनानंतर टाकेहर्षची पाणी योजना सुरु, ग्रामस्थांचा आनंदोत्सव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – जळगाव : भुसावळमध्ये गॅस संच दुरुस्तीवेळी मोटारीचा पेट

२०२४ मध्ये जिल्ह्यात ८७ हत्यांची नोंद झाली असून ८५ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आहे. १८ दरोडे पडले. दरोड्याचे सर्व १८ गुन्हे उघडकीस आणले. ८६ गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी सद्यस्थितीत १८ गुन्हेगार हद्दपार करण्यात आले असून एमपीडीए कायद्यान्वये पाच गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.