नाशिक : शेतात फवारणी करीत असताना औषध नाकातोंडात गेल्याने ४२ वर्षाच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तसेच शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. या दोन मृत्यू प्रकरणी वेगवेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील शेतकरी सुभाष नानेकर (४२) हे शेतात फवारणी करीत होते. फवारणी करताना नाकातोंडात औषध गेल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. हा प्रकार शेतातील अन्य लोकांच्या लक्षात येताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : तडीपार तलवारधारी ताब्यात, टवाळखोरांना दणके; पोलिसांची कारवाई

दुसऱ्या घटनेत ज्ञानदेव जाधव (३७) हे शेतातील विहिरीवर इलेक्ट्रिक मोटर सुरु करण्यासाठी गेले होते. ते लवकर घरी न आल्याने त्यांचा शेतात शोध घेतला असता ते विहिरीत पडलेले दिसले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.