नाशिक – दिवाळीच्या सुट्टीत प्रवाश्यांची संख्या लक्षणीय वाढली असताना एसटी महामंडळाच्या ताफ्यातील बसगा़डीच्या तांत्रिक दोषाचा फटका प्रवाश्यांना सहन करावा लागत आहे. गुरुवारी सकाळी नाशिकहून पुण्याला निघालेली शिवशाही अकस्मात उद्भवलेल्या तांत्रिक दोषामुळे संगमनेरलगतच्या टोल नाक्यावरील कक्षाच्या भिंतीला धडकली. बसच्या तीन काचा फुटल्या. यानंतर बसमधील लहान मुले, महिलांसह सुमारे ४२ प्रवासी तीन तास अडकून पडले. पर्यायी बसची व्यवस्थाही तातडीने न झाल्यामुळे प्रवासी वैतागले. तिकीटाचा परतावाही केवळ संगमेनर ते पुणे इतकाच देण्याची तयारी दर्शविली गेली. या घटनाक्रमाने महामंडळाच्या कारभारावर प्रवाशांनी संताप व्यक्त करीत जुनाट बस देखभाल, दुरुस्ती न करता वाहतुकीला वापरली गेल्याचा आक्षेप नोंदवला.

दिवाळीच्या सुट्टीमुळे गावी गेलेले विद्यार्थी, नोकरदार पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले असून बाहेर गावी जाणाऱ्यांच्या गर्दीमुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक, ठक्कर बजार, मुंबई नाका स्थानक गजबजले आहे. काही ठिकाणी तिकीट काढण्यासाठी भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. प्रवाशांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन तात्कालिक लाभ घेण्याच्यादृष्टीने महामंडळाने काही दिवसांसाठी भाडेवाढ केली. वाहतुकीचे अन्य पर्याय फारसे सुरक्षित नसल्याने प्रवाश्यांना एसटी शिवाय गत्यंतर नसते. परंतु, या प्रवासाची झळ प्रवाश्यांना सहन करावी लागल्याचे उघड झाले आहे. नाशिक-पुणे हा एसटी महामंडळाचा सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्ग. या मार्गावर नाशिकहून दैनंदिन ३६ ते ४० बस पुण्याकडे सोडल्या जातात. प्रवाश्यांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन महामंडळाने आपल्या ताफ्यातील जुनाट शिवशाही बसही या मार्गावर आणल्याची साशंकता प्रवासी व्यक्त करतात. यासाठी गुरुवारी सकाळी दहा वाजता ठक्कर बजार स्थानकातून मार्गस्थ झालेल्या शिवशाहीचा दाखला दिला जात आहे. प्रचंड गर्दीत अर्धा तास रांगेत थांबून या बसमध्ये जागा मिळालेल्या प्रवाश्यांना नंतरही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

Kalamboli Iron and Steel Market, Kalamboli Iron and Steel Market Plagued by Thefts, Police Arrest First Suspect, robbery in Kalamboli Iron and Steel Market, Kalamboli Iron and Steel Market news, marathi news, panvel news, robbery news, kalamboli news,
कळंबोली लोखंड बाजारातील गोदाम फोडून २६ लाखांचा माल मुंबईला विकणाऱ्याला अटक
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Men travel in womens coaches Safety of women passengers of air-conditioned local at risk
मुंबई : महिला डब्यातून पुरुषांचा प्रवास, वातानुकूलित लोकलच्या महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा

संगमनेरलगतच्या टोल नाक्यावर बसच्या मागील बाजूच्या सप्सेशन्समध्ये दोष उद्भवला. ती कक्षाच्या भिंतीवर आदळली. यात बसच्या तीन काचा फुटल्या. या प्रकाराने बसमधील प्रवासी धास्तावले. तांत्रिक दोष उद्भवलेली बस पुढे नेणे धोकादायक होते. नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. काही वेळाने संगमेनर एसटी आगाराचे अधिकारी टोल नाक्यावर पोहोचले. पर्यायी बसची व्यवस्था करून प्रवाश्यांना पुण्याकडे मार्गस्थ केले जाईल, असे सांगितले गेले. परंतु, दोन-तीन तास होऊनही पर्यायी बस टोल नाक्यावर आलीच नाही. लहानग्यांसह काही महिला प्रवासी होत्या. त्यांच्यासह इतर प्रवासी उन्हातान्हात महामार्गावर ताटकळले. काहींनी तिकीटाचे पैसे परत मागितले. तेव्हा संगमनेर ते पुणे या प्रवाशाचे भाडे परत दिले जाईल, असे सांगण्यात आले. तीन ते साडेतीन तासाच्या प्रतिक्षेनंतर संबंधित प्रवाश्यांना दुसऱ्या गाडीत बसवून पुण्याकडे मार्गस्थ करण्यात आले. रस्त्यावर उभे राहून सर्व प्रवासी दमले होते.

हेही वाचा >>>ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी अटक

प्रवाश्यांचा संताप

नाशिक-पुणे (शिवशाही बस) प्रवासासाठी प्रत्येकाने प्रती ५२५ रुपये भाडे मोजले होते. नाशिक ते संगमनेर टोल नाका हा प्रवास या बसमधून झाला. ती नादुरुस्त झाल्यानंतर दुसऱ्या साध्या बसमधून प्रवाश्यांना पुढे मार्गक्रमण करावे लागले. शिवशाही आणि साध्या बसमधील प्रवासी भाड्यात फरक आहे. तीन तास ताटकळलेल्या प्रवाशांना महामंडळाने या फरकानुसार पुढील प्रवासाचा हिशेब करून पैसे परत दिले नसल्याचे प्रवासी सांगतात. साध्या बसमधून प्रवासाला शिवशाहीचे भाडे आकारले गेले. संगमनेर ते पुणे प्रवासात वाहकाने गाडी मंचरसह इतर स्थानकात नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रवाश्यांनी तीव्र विरोध केला. शिवशाही कुठेही न थांबता थेट पुण्यात जाते. संगमनेरमध्ये आधीच तीन तास वाया गेले आहेत. काहींना पुढील प्रवासासाठी पुण्यातून दुसरी बस पकडायची आहे. त्यामुळे रस्त्यात कुठेही न थांबवता बस थेट शिवाजीनगरला नेण्याची आग्रही मागणी सर्वांनी केली. संतप्त प्रवाश्यांसमोर वाहक-चालकाला नमते घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

हेही वाचा >>>नाशिक: दुचाकी चोरटे ताब्यात, आठ मोटारसायकल हस्तगत

महामंडळाकडून प्रत्येक बस दैनंदिन तपासणी केल्याशिवाय प्रवासासाठी सोडली जात नाही. दैनंदिन, साप्ताहिक व मासिक अशा पध्दतीने महामंडळाच्या सर्व बसची तपासणी केली जाते. आरटीओच्या नियमानुसार निश्चित केलेल्या वयोमर्यादेतील बसचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी केला जातो. गुरुवारी नाशिक-पुणे मार्गावरील शिवशाहीबाबत घडलेला प्रकार अकस्मात उद्भवलेल्या तांत्रिक दोषाचा भाग असू शकेल. या संदर्भात प्रवाश्यांनी तक्रार दिल्यास चौकशी केली जाईल. – अरुण सिया (विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नाशिक)