नाशिक: शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार थांबवा आणि शोधा ( स्टॉप अँड सर्च) मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेतंर्गत ६०० हून अधिक टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.

किरकोळ कारणावरून रस्त्यावर भांडणाऱ्यांची संख्या कमी नाही. यातून मारामारी, हत्या असे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. परिमंडळ एक अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणारे, शांतता धोक्यात येईल अशी वर्तणुक असणाऱ्या ३४० तसेच परिमंडळ दोन अंतर्गत ३४२ जणांवर कारवाई करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुक्तालय हद्दीत ६८२ टवाळखोरांवर कारवाई झाली. यापुढेही अशी कारवाई सुरू राहणार असून संशयित वाहने आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त कर्णिक यांनी दिला आहे.