नाशिक – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष ग्रामपंचायतीत जलस्वराज्य योजनेची नळ पाणी पुरवठा योजना दोन वर्षांपासून बंद होती. ग्रामपंचायतीने वीज देयक न भरल्याने योजनेची वीज जोडणी कंपनीकडून बंद करण्यात आली होती. तेव्हापासून जल योजना बंद होती. श्रमजीवी संघटनेने पुढाकार घेत आंदोलन केल्यानंतर अखेर गावात पाणी आले.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाळा संपताच टंचाई सुरु होते. काही गावांमध्ये पाणी योजना असतानाही कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना टंचाईला तोंड द्यावे लागते. वर्षानुवर्ष या गावांच्या या परिस्थितीकडे प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही. आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला जाग येते, हे टाकेहर्ष येथील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. टाकेहर्ष येथील जल योजना दोन वर्षांपासून बंद होती. त्यानंतर गावात २०२३ पासून जलजीवन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू झाले. परंतु, ते कामही अर्धवट आहे. त्यामुळे दोन योजना असूनदेखील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते. याबाबात अनेकदा पत्रव्यवहार करूनही कोणीच दखल घेतली नाही. कोट्यवधी रुपयांच्यो दोन योजना असताना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली होती.

हेही वाचा – गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीचे काम प्रारंभ, नाशिकचा तीन दशकांचा प्रश्न मार्गी लागणार

हेही वाचा – नाशिक : म्हाडाकडून नव्याने ५५५ सदनिकांचे वितरण

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावात जलस्वराज्य योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजना होती. मात्र वीज देयक थकल्याने वीज जोडणी तोडण्यात आली. तेव्हापासून जुनी योजना देखील बंद होती. गावाला वर्षभरापासून पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते. महिलांना एका खासगी विहीरीवर जाऊन मोठी कसरत करून पाणी भरावे लागत होते. पिण्यासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने त्र्यंबक- देवगाव रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार गुरूवारी पाणी पुरवठा योजना सुरू झाली. त्यामुळे ग्रामस्थांनी विजयी मेळावा घेऊन आनंदोत्सव साजरा केला.