नाशिक: बारा बंगला जलशुध्दीकरण प्रकल्पात नव्याने उभारलेल्या उपकेंद्राची चाचणी आणि विविध जलशुध्दीकरण केंद्र, जलकुंभ येथे करण्यात येणाऱ्या कामांमुळे शनिवारी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी सकाळीही कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
याबाबतची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील जलशुध्दीकरण केंद्र आणि जलकुंभ येथे स्काडा प्रणाली बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्या अंतर्गत विविध कामे केली जाणार आहेत. बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र येथील नव्याने उभारलेल्या उपकेंद्राची चाचणी आणि ते कार्यान्वित करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे.

शहरातील सर्व भागातील जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभ येथे ही कामे करावयाची आहेत. त्यामुळे सर्व जलशुध्दीकरण केंद्र बंद ठेवण्याची आवश्यकता आहे. यामुळे गंगापूर धरण, चेहेडी व मुकणे धरण पंपिंग स्टेशन बंद ठेवणे क्रमप्राप्त असणार आहे. याच दिवशी मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे उपकेंद्रात प्रतिबंधात्मक देखभालीची कामे करण्याचे नियोजन आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामुळे गंगापूर, मुकणे धरणातून उपरोक्त काळात पाणी उचलता येणार नाही. मनपाचे सर्व जलशुध्दीकरण केंद्र बंद राहणार असल्याने शनिवारी संपूर्ण शहरात पाणी पुरवठा होणार नाही. तसेच रविवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल,. याची नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे महापालिकेने म्हटले आहे.