scorecardresearch

त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्यात आता पुरूषांनाही बंदी

शनिशिंगणापूर येथे चौथऱ्यावर जाऊन महिलांना देवताचे दर्शन घेऊ देण्याच्या मुद्यावरून सुरू झालेला वाद

त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्यात आता पुरूषांनाही बंदी

देवस्थान विश्वस्तांचा निर्णय
शनिशिंगणापूर येथे चौथऱ्यावर जाऊन महिलांना देवताचे दर्शन घेऊ देण्याच्या मुद्यावरून सुरू झालेला वाद आणि न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर रविवारी त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्तांनी यापुढे मंदिराच्या गाभाऱ्यात पुरूषांनाही दर्शनासाठी जाता येणार नाही, असा ठराव केला. याआधी केवळ पुरूषांना दर्शनासाठी गाभाऱ्यात जाता येत होते. नव्या निर्णयाची अंमलबजावणी चार एप्रिलपासून होणार आहे. दिवसभरातून तीन वेळा होणाऱ्या सरकारी पुजेसाठी पुजाऱ्यांना मात्र गाभाऱ्यात प्रवेश राहणार आहे.
हलांना बाहेरूनच दर्शन का या महिलांच्या मनातील भावनांमुळे निर्माण होणाऱ्या वादाचा फटका रोज राज्यभरातून येणाऱ्या हजारो भाविकांना बसू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे ट्रस्टकडून स्पष्ट करण्यातोले आहे. मात्र दिवसभरातून तीन वेळेस होणाऱ्या सरकारी पुजेसाठी मंदीर पुजाऱ्यांना आता जाता येणारोहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील गाभाऱ्यात जाण्यास तसेच शनिशिंगणापूर येथे शनिदेवतेच्या पुजेसाठी चौथऱ्यावर जाण्यास महिलांना बंदी आहे. त्याविरोधात काही महिन्यांपासून तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली भूमाता ब्रिगेड लढत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात गाभाऱ्यातून दर्शन मिळावे म्हणून भूमाता ब्रिगेडने महिन्याभराच्या कालावधीत दोनवेळा धडक देण्याचा प्रयत्न केला. स्थानिक महिला आणि देवस्थान विश्वस्त मंडळाच्या तीव्र विरोधामुळे त्यांना दोन्ही वेळा परत फिरावे लागले होते. मंदिर आणि गाभाऱ्यातील प्रवेशास लिंगभेद न करता महिलांनाही प्रवेश देण्यासंदर्भात नुकताच न्यायालयाने निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शनिवारी भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शनिशिंगणापूर येथील चौथऱ्यावर दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न केला असता मंदिर विश्वस्त आणि तृप्ती देसाई यांच्यात जोरदार वाद-विवाद झाले. संपूर्ण शनिशिंगणापूर गावास त्यामुळे पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दूरवरून आलेल्या अनेक भाविकांना त्यामुळे शनिचे दर्शन न घेता परतावे लागले होते.
तृप्ती देसाई या न्यायालयीन निकालाचा आधार घेत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यासाठी येतील याची शक्यता असल्याने मंदिर देवस्थान विश्वस्तांची बैठक झाली. याआधी पुरूषांना गाभाऱ्यात असलेला प्रवेशही बंद करण्यासह यापुढे गाभाऱ्यात स्त्री-पुरूष कोणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाभाऱ्यात प्रवेशावरून होणारे वाद-विवाद आणि त्यामुळे दूरवरून येणाऱ्या भाविकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे देवस्थानचे म्हणणे आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात येणार आहे. बैठकीस विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षा उर्मिला फडके-जोशी, श्रीकांत गायधनी, ललिता शिंदे यांसह मंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-04-2016 at 00:04 IST

संबंधित बातम्या