नाशिक – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या संशयितास स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकने ताब्यात घेतले असून त्यास अंबड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

हेही वाचा – भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन

हेही वाचा – युनेस्को पथकाकडून ‘साल्हेर’ची हवाई पाहणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भुजबळ यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी समाज माध्यमात करण्यात आल्याची तक्रार अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेनेही सुरु केला होता. पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताची तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती घेतली असता तो बीडमधील आष्टी येथील असल्याचे लक्षात आले. त्यानुसार तपास पथक आष्टी परिसरात गेले असता तो नगर-आष्टी रस्त्यावर आढळला. त्याने रवींद्र धनक (रा. पाथर्डी फाटा) असे आपले नाव सांगत गुन्ह्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अंबड पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयितास न्यायालयात हजर केले असता तीन ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.