जळगाव – व्यक्ती, राजकीय-अराजकीय संघटना मोर्चा काढत निवेदन देण्यास येत असतात. आता मोर्चातील केवळ पाच व्यक्तींना निवेदन देण्याची मुभा राहणार आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रकाद्वारे केल्या आहेत.

जिल्हाधिकारी, उपविभागीय आणि तहसील कार्यालय येथे दररोज विविध व्यक्ती, राजकीय संघटना, अराजकीय संघटना मोर्चा काढून निवेदन देण्यास येत असतात. निवेदन देण्यासाठी विविध संघटनांमार्फत कार्यालयात येऊन मोठमोठ्याने घोषणाबाजी करून कार्यालयातील शांतताभंग करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याअनुषंगाने जिल्हा दंडाधिकारी अमन मित्तल यांनी परिपत्रक काढले असून, याद्वारे निवेदन देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. याअनुषंगाने संबंधित सर्व पोलीस ठाण्यांतील निरीक्षकांना सूचना निर्गमित केल्या आहेत.

हेही वाचा – नाशिक : संसार टिकत नसल्याने बालिकेला गळफास देत मातेची आत्महत्या

हेही वाचा – नाशिक : निवृत्ती चावरे मृत्यूची चौकशी करावी ; एल्गार संघटनेची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध व्यक्ती, राजकीय संघटना, अराजकीय संघटना, समूह यांनी संबंधित पोलीस ठाण्यात निवेदन दिल्यानंतर संबंधित पोलीस निरीक्षकांनी ज्या विभागास, कार्यालयास निवेदन देण्यात येणार आहे, त्या विभाग, कार्यालयाच्या प्रमुखांना किमान एक दिवस आधी कळविणे आवश्यक राहील. निवेदन देताना मोर्चात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षात घेऊन त्या विभागात, कार्यालयात पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्याची दक्षता घेण्यात यावी. मोर्चामधील केवळ पाच व्यक्तींना निवेदन देण्याची मुभा राहील. मोर्चा काढून निवेदन देताना शासकीय कार्यालयात शांतता ठेवणे आवश्यक राहील. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना, कार्यालयात उपस्थित नागरिकांना घोषणाबाजीमुळे त्रास होणार नाही, याबाबत संबंधितांना पूर्वसूचना देण्यात यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संघटना यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी मित्रत्व यांनी म्हटले आहे