नाशिक: महावितरणच्या नाशिक शहर विभाग दोन अंतर्गत असलेल्या इंदिरा नगर कक्षाच्या शिवाजीवाडी वीज उपकेंद्रात अधिक क्षमतेचे रोहित्र बसविण्याचे काम शनिवारी करण्यात येणार असल्याने या दिवशी सकाळी सात ते रात्री १० या वेळेत वीज पुरवठा बंद राहणार आहे.

भारतनगर, दिपालीनगर, शनी मंदिर, मानवता क्यूरी, कल्पतरू, भाभानगर या वाहिन्या आणि अशोका रुग्णालय वाहिन्यांवरील भागात वीज पुरवठा खंडित असणार आहे. तसेच दिपालीनगर वाहिनीवरील दिपालीनगर, विनयनगर, गणपतीनगर, काळे मळा, सुचितानगर, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, परबनगर, बापू बंगला, साईनाथनगर, अशोका रुग्णालय रस्ता या भागाचा समावेश असणार आहे.

भारतनगर वाहिनीवरील भारतनगर, शिवाजीवाडी, रहेनुमानगर, ममतानगर, जयदीपनगर, चीस्तीया कॉलनी, खोडेनगर, रहेमतनगर, गणेशनगर, वडाळा गाव, मिल्लतनगर, अजमेरी कॉलनी आदी परिसर तर शनी मंदिर वाहिनीवरील शनीमंदिर, सुचितानगर, आदर्श कॉलनी, कमोदनगर, प्रसन्न कॉलनी, गीतांजली कॉलनी व परिसर.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्पतरूनगर वाहिनीवरील अशोका मार्ग, मातोश्री कॉलनी, निसर्ग कॉलनी, खोडेनगर, गोदावरीनगर, रविशंकर मार्ग आदी परिसराचा समावेश असणार आहे. रोहित्र क्षमता वाढीसाठी हाती घेतलेले काम काम आधी पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तत्काळ सुरू करण्यात येईल. याची ग्राहकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.