सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या पुस्तक मित्र मंडळाच्या वतीने शनिवारी सायंकाळी सहा वाजता ‘स्मरण अरुण टिकेकरांचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मु. श. औरंगाबादकर सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात दै. लोकमतचे संपादक हेमंत कुलकर्णी, प्रा. अनंत येवलेकर, वंदना अत्रे सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ विचारवंत, समाजसंस्कृती व इतिहासाचे भाष्यकार असणाऱ्या टिकेकर यांनी एक दशकाहून अधिक काळ दै. ‘लोकसत्ता’चे संपादकपद भूषविले. ‘लोकसत्ता’ला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. नाशिककरांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाने केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2016 रोजी प्रकाशित
‘सावाना’तर्फे आज ‘स्मरण अरुण टिकेकरांचे’
‘स्मरण अरुण टिकेकरांचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-02-2016 at 02:14 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remember to aroon tikekar event in nashik