संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे सरकारवर सडकून टीका केली. राज्यातील सरकार गेंड्याच्या कातडीचं असून रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण पुढे येत असताना हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखं बसून आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, यावेळी ते एका पत्रकारावर भडकल्याचेही बघायला मिळालं.

हेही वाचा – “राज्यातील सरकार गेंड्याच्या कातडीचं, रोज एका मंत्र्याचे…”, भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून संजय राऊतांचं शिंदे सरकारवर टीकास्र

NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
Journalist Limesh Kumar Jangam arrested for demanding ransom of five lakhs
चंद्रपूर : पत्रकार लिमेशकुमार जंगमला पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक
Candidate for Nashik seat not announced yet says Neelam Gorhe
नाशिकच्या जागेचा उमेदवार अद्यापपर्यंत जाहीर झालेला नाही : नीलम गोऱ्हे
Rohit Pawar, crab
आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत आणला खेकडा? ‘पेटा इंडिया’ने केली ‘ही’ मागणी

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी नाशिकमधील शिवसेनेच्या ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. याबाबत आज संजय राऊत यांना विचारण्यात असता, “काही लोकं इथून सोडून गेले आहेत. त्यांचे नाव मला घ्यायचं नाही. पण त्यांना शिवसेनेत नवीन असतानाही नाशिक महापालिकेत विरोधी पक्षनेते पद दिलं होतं. त्यानंतर ते सात वर्ष महानगर प्रमुख होते. त्यामुळे त्यांच्या डीएनए चेक करावा लागेल. बाहेरून आलेल्या माणसाला पक्षाने अजून काय द्यावं?” अशी प्रतिक्रिया दिली. यावरून “शिवसेनेने बाहेरून आलेल्या लोकांना पदं दिलीत, त्यामुळे निष्ठावंत मागे राहतात, असं तुम्हाला वाटतं का?” असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता, “अरे तू काय इथे कोर्ट मार्शल करायला बसलाय का?” असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं.

हेही वाचा – “…तेव्हा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे संजय राऊतांना चपलाने मारतील”, नारायण राणेंचा गंभीर आरोप

“हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही”

“महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे परिवर्तनाच्या दिशेने चालले आहे. २०२४ किंवा त्यापूर्वीसुद्धा हे परिवर्तन होऊ शकते. हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, हे मी यापूर्वी सुद्धा सांगितलं आहे. न्यायालयावर जर दबाव आला नाही, तर संविधान आणि कायद्याचे उल्लंघन करून आलेलं हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. कायद्यानुसार १६ आमदार अपात्र ठरतील. त्यामुळे सरकारकडून वेळकाढू धोरण रावबलं जात आहे. हे सरकार व्हेंटिलेटरवर आहे, ते एका सर्वोच्च न्यायालयाने काढलं तर ‘हे राम’ नक्की आहे”, अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी शिंदे सरकारवर केली.

हेही वाचा – VIDEO: अपघातानंतर शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मी मुंबईला जात असताना…”

“हे सरकार गेंड्याच्या कातडीचं”

“काही दिवसांपूर्वी आम्ही नागपूरमध्ये होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही तिथे उपस्थित होते. सरकारचा गोंधळ आम्हाला जवळून बघता आला. मुळात हे सरकार अस्तित्वातच नाहीये. रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे येत आहेत. मात्र, सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूखंडाची दोन प्रकरणे, त्यानंतर अब्दुल सत्तार यांचा जमीन घोटाळा, उदय सामंत बोगस डिग्री प्रकरण, अशी प्रकरणं बाहेर येऊनही सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखं होतं. जणू काही घडलंच नाही आणि विरोधी पक्षच गुन्हेगार आहे, अशा पद्धतीने काम करत होतं”, असेही ते म्हणाले.