लोकसत्ता वार्ताहर

नंदुरबार : घोड्यांच्या बाजारामुळे आणि दत्त जयंतीनिमित्त सुरु झालेल्या यात्रोत्सवामुळे प्रसिध्द असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह पोलीस शिपायास १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने ताब्यात घेतले.

आणखी वाचा-“मनोज जरांगे यांच्या स्मरणशक्तीत गडबड”, छगन भुजबळ यांचे टिकास्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सारंगखेडा यात्रेनिमित्त तक्रारदाराने दारु वाहतुकीचा व्यवसाय करण्यासाठी परवानगी मागितली असता सारंगखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील (४४) यांनी शनिवारी २१ हजार रुपयांची लाच मागितली. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. दरम्यान, तडजोडीअंती १० हजार रुपयांची मागणी पाटीलने केली. लाचेची रक्कम शनिवारी चालक, पोलीस शिपाई गणेश गावित (३८) याने पंचांसमक्ष स्वीकारताच पथकाने त्यास आणि पोलीस निरीक्षक पाटील यांना रंगेहात ताब्यात घेतले. सापळा अधिकारी म्हणून निरीक्षक परशुराम कांबळे यांनी काम पाहिले. पथकात हवालदार सचिन गोसावी आणि प्रफुल्ल माळी यांचा समावेश होता.