शिवसेना फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे गटात स्थानिक पातळीवर चाललेल्या संघर्षात आता नवा अध्याय जोडला जाण्याच्या मार्गावर आहे. उभयतांच्या वादात महानगरपालिकेतील शिवसेनाप्रणीत म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या कार्यालयास टाळे ठोकले गेले होते. आता शालिमार येथील ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयाचा करारनामा आपल्याकडे असल्याचे सांगत त्यावर दावा सांगण्याचा मनसुबा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. अर्थात प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यास नकार दिला असला तरी खा. संजय राऊत यांच्या शिवराळ भाषेतील विधानांनी ती वेळ देखील येऊ शकते, असे सूचित केल्याने पुढील काळात पक्ष कार्यालयाच्या ताब्यावरून दोन्ही गटात वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>>नाशिकमध्ये प्रथमच इ कचरा संकलन मोहिमेची तयारी

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यात शिंदे गटात सामील झालेले नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, मनपातील माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि इतर पदाधिकाऱ्यांवर कठोर शब्दात टिकास्त्र सोडले होते. त्यास शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले. प्रारंभी रुपेश पालकर यांनी ठाकरे गटाच्या शालिमार येथील पक्ष कार्यालयाचा करारनामा सादर केला. वडील शिवाजी पालकर हे शिवसेनेचे महानगरप्रमुख होते. त्यावेळी त्यांनी पक्ष कार्यालयासाठी शिवाजी रस्त्यावरील ३३० चौरस फूट जागा भाडेतत्वावर घेतली होती. या जागेवर आता आम्ही दावा सांगणार असल्याचे रुपेश यांनी नमूद केले. मात्र, अजय बोरस्ते यांनी आम्ही इतक्या छोट्या मनाचे नसून तसा दावा सांगण्याची गरज नसल्याचे नमूद केले. खासदार राऊत यांनी याच कार्यालयातून आगपाखड केली होती. शिंदे गटात गेलेल्यांना त्यांनी पालापाचोळा संबोधले. जिथे बसून ते टीका करतात, ती कार्यालयाची जागा शिंदे गट अस्थिर करू शकतो, हे अप्रत्यक्षपणे दर्शविले गेले.

हेही वाचा >>>नाशिक: दोन वर्षानंतर निमाच्या कामकाजाचा श्रीगणेशा; नवनियुक्त २१ विश्वस्तांकडे कार्यभार

यापूर्वी म्युनिसिपल कर्मचारी सेना ताब्यात घेण्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात संघर्ष झाला होता. संघटनेचे मनपातील कार्यालय ठाकरे गटाने ताब्यात घेतल्यानंतर शिंदे गटाने हा विषय पोलिसांपर्यंत नेला. अखेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी या कार्यालयास टाळे ठोकले. पुढील काळात याची पुनरावृत्ती पक्ष कार्यालयाबाबत होऊ शकते हे सूचकपणे अधोरेखीत करण्यात आले आहे.