राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २०१६ या वर्षासाठी देण्यात येणारा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना जाहीर झाला आहे. जळगाव येथे उद्या, शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सरकारतर्फे दरवर्षी शास्त्रीय गायन आणि वादन या क्षेत्रात प्रदीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मान चिन्ह असे आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे, पंडित जसराज, ज्येष्ठ सतारवादक पंडित रामनारायण आदींना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. जळगाव येथील बाल गंधर्व नाट्यगृहात संध्याकाळी साडेसहाला हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer begum parveen sultana gets pandit bhimsen joshi lifetime achievement award
First published on: 16-03-2017 at 15:30 IST