नंदुरबार : जिल्ह्यातील काही लोकांनी स्वतःची भावकी, भाऊ, मुलगी यांचीच प्रगती केली. आदिवासी विकास विभागाकडून मिळणाऱ्या लाभाच्या योजनेला अर्थमंत्री निधी देतो. त्यामुळे कोणी आपण योजना दिली असे सांगत असेल तर विश्वास ठेवू नका. मतदारांना आदिवासी विकास विभागाच्या योजना बंद करण्याची कोणी धमकी देत असेल परंतु, कोणीही योजना बंद करु शकत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदिवासी विकास मंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांना ठणकावले.

नवापूर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार भरत गावित यांच्या प्रचारार्थ सोमवारी दुपारी खांडबारा येथे पवार यांची सभा झाली. या सभेत विरोधी काँग्रेसऐवजी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनाच लक्ष्य करण्याची वेळ त्यांच्यावर आली. या मतदार संघात डॉ. गावित यांचे लहान बंधू शरद गावित हे अपक्ष उमेदवार आहेत.

हेही वाचा…सैन्य भरतीसाठी देवळाली कॅम्प येथे एकाच दिवसात १२ हजार तरुण उपस्थित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्ता, वीज, सिंचन याची नवापूरमध्ये परिस्थिती वाईट आहे. याठिकाणी ठराविक लोकांची मक्तेदारी आहे, अशी टीकाही त्यांनी केली. शिक्षण, आरोग्य, पेसा भरती यावर काम करून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचा मानस आहे. नवापूर सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही पवार यांनी दिले.