नाशिक – मणिपूरमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीसह आदिवासी संघटनांच्या वतीने शनिवारी बागलाण (सटाणा) तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चाला काही जणांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीमुळे गालबोट लागले. दगडफेकीत २० पेक्षा अधिक वाहनांच्या काचा फुटल्या. या प्रकरणी पोलिसांनी ३० पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा >>> नाशिक: सर्पदंशामुळे बालकाचा मृत्यू

मणिपूर येथील हिंसाचारात आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन, मोर्चे काढण्यात येत आहेत. मणिपूरसह देशभरात आदिवासी, दलित, बौद्ध, अल्पसंख्यांकावर वाढलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमिवर बागलाण तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी तसेच विविध आदिवासी संघटना, पुरोगामी समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने शनिवारी दुपारी बागलाण तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपासून मोर्चाला सुरुवात झाली.

हेही वाचा >>> मालेगावात चोऱ्यांमध्ये वाढ; कारवाईची आम्ही मालेगावकर संघटनेची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मोर्चा शांततेत तहसील कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. सभेनंतर मोर्चेकरी परतत असताना पाटील चौकातत अचानक काही जणांनी ठिय्या दिल्याने गोंधळ उडाला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला असता टोळक्याने वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्काळ धरपकड सत्र सुरू करुन ३० पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतले आहे.