लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या दुलाजी पाटील कृषी महाविद्यालयाच्यावतीने दिंडोरीतील चाचडगाव येथे हरमन-९९ या काश्मिरी सफरचंद प्रजातीची लागवड करण्यात आली होती. ही लागवड यशस्वी झाली असून झाडे सफरचंदांनी बहरली आहेत.

या प्रयोगाने स्थानिक शेतकऱ्यांना भुरळ पडली आहे. या प्रयोगाचे शेतकरी सभासद व हितचिंतक यांच्याकडून कौतुक होत असल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, उपसभापती देवराम मोगल, शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे, प्राचार्य डॉ. आय. बी. चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा… हतनूरचे दहा दरवाजे उघडल्याने तापीच्या पातळीत वाढ; धुळे जिल्हा प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चाचडगाव येथील जागेत महाविद्यालयाने सफरचंदासह अननस, आंब्याच्या सात प्रकारच्या जाती, जायफळ, कोकम, दालचिनी, नारळाच्या विविध जाती, लेमन ग्रास, फणस, पेरू, लिंब तसेच इतर वनस्पतींची प्रयोगशील लागवड केली आहे. तो प्रयोग देखील यशस्वी होण्याच्या मार्गावर असून त्यासाठी सिंचन पद्धतीचा वापर केला आहे. त्यामध्ये आंतरपिके घेतली जातात. तसेच या ठिकाणी रोपवाटिकाही उभारलेली असून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तज्ज्ञांची मदत घेऊन शेतीचा विकास करण्याचे प्रयोग सुरु आहेत.