scorecardresearch

Premium

नाशिक शहरावरील पाणी कपात तुर्तास लांबणीवर

पाणी आरक्षणाच्या विषयावर जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची बैठक पार पडली

decision review water reservation daily usage approved Nashik postponed
नाशिक शहरावरील पाणी कपात तुर्तास लांबणीवर (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

नाशिक: महापालिकेला मंजूर झालेले पाणी आरक्षण आणि दैनंदिन वापर याचा महिनाभराने पुन्हा आढावा घेऊन शहरात पाणी कपात करायची गरज आहे की नाही, याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी म्हटले आहे. यामुळे शहरवासीयांवर दाटलेले पाणी कपातीचे मळभ तूर्तास दूर झाले आहे. पाटबंधारे विभागाच्या मते महापालिकेला विहित निकषापेक्षा अधिक आरक्षण देण्यास सहमती दर्शविली आहे. याशिवाय गंगापूर धरणाच्या तळाकडील अधिकचे ६०० दशलक्ष घनफूट पाणी व्यवस्था केल्यास मनपास उचलता येणार असल्याकडे लक्ष वेधले जात आहे.

पाणी आरक्षणाच्या विषयावर जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची बैठक पार पडली. शहरातील पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेने ६१०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी केली होती. महापालिका प्रतिदिन १९.७४ टक्के पाणी वापरते. मनपाच्या आकडेवारीनुसार १५ ऑक्टोबर २०२३ ते ३१ जुलै२०२४ पर्यंत ५७६४ दशलक्ष घनफूट पाण्याची गरज भासेल, असा दाखला पाटबंधारे विभागाने दिला. गंगापूर धरणाच्या तळाकडील ६०० दशलक्ष घनफूट पाणी हिशेबात न धरता महापालिकेला ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण देण्यास जलसंपदा विभागाने संमती दर्शवली आहे. मागणीच्या तुलनेत कमी पाणी मिळणार असल्याने ३१ जुलैपर्यंत नाशिककरांची तहान भागवण्यासाठी पाणी कपातीचा विचार महापालिकेने सुरू केला होता. या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली.

Project of Dutt Factory
कोल्हापूर : दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा पथदर्शी प्रकल्पावर शासनाकडून शिक्कामोर्तब; नापीक जमिनीवर पिकांची हिरवाई फुलली
Shirpur sub-divisional officer
शिरपूर उपविभागीय अधिकाऱ्याचा वाहन चालक लाच प्रकरणात ताब्यात
water shortage satara
सातारा : टंचाई काळात उपसाबंदी निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Co-operative department raid at Umarkhed
यवतमाळ : घर, भूखंडाचे कागदपत्र अडवून अवैध सावकारी; उमरखेड येथे सहकार विभागाचा छापा, सावकाराकडून १६१ कागदपत्रे जप्त

हेही वाचा… नीती आयोगाच्या अनुदानाचा अपहार, ठाकरे गटाच्या उपनेत्याविरोधात नवीन गुन्हा

महापालिकेने गंगापूरच्या तळाचे पाणी उचलल्यास कपातीची गरज भासणार नसल्याचा मुद्दा मांडला गेला. तळाकडील पाणी उचलण्यासाठी व्यवस्था करण्याचा विषय नेक वर्षांपासून रखडलेला आहे. महापालिकेचा पाणी वापर आणि धरणात उपलब्ध जलसाठा याचे अवलोकन करण्यासाठी दर महिन्याला जिल्हाधिकारी आढावा बैठक घेणार आहेत. तुर्तास पाणी कपातीचा कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मनपा आयुक्त डॉ. करंजकर यांनी सांगितले. पुढील आढावा बैठकीनंतर त्याची गरज आहे की नाही यावर विचार होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The decision to review the water reservation and daily usage approved of nashik is postponed dvr

First published on: 01-12-2023 at 12:54 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×