लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित सुपर ५० उपक्रमाच्या निवडीसाठी रविवारी जिल्ह्यातील १६ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. सकाळी दहा ते दुपारी साडेबारा या वेळेत ही परीक्षा होईल.

जेईई आणि नीट परीक्षेसाठी निवासी स्वरुपाचे प्रशिक्षण उपलब्ध करणाऱ्या जिल्हा परिषदेच्यावतीने या वर्षीही सुपर ५० हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून ५५ (जेईई) आणि ५५ (नीट) अशा एकूण ११० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्याकरिता १६ जुलै रोजी निवड चाचणी होणार आहे. या परीक्षेत १०६६ मुली, ३००३ मुलगे असे एकूण चार हजार ९६९ विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत.

हेही वाचा… नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी; नियोजनाला शिंदे गट-राष्ट्रवादी सुप्त संघर्षाची किनार; भुजबळ अंतर राखून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तालुकानिहाय ही परीक्षा १६ केंद्रांवर होईल. यात बागलाण तालुक्यातील लो. पं. ध. पा. मराठा इंग्लिश शाळा, चांदवड – नेमिनाथ जैन विद्यालय, देवळा – श्री शिवाजी मराठा विद्यालय, दिंडोरी – जनता इंग्लिश शाळा, इगतपुरी – जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कळवण – आर. के. विद्यालय, मालेगाव – के.बी.एच. विद्यालय आणि आर.बी.एच. कन्या विद्यालय, नांदगाव न्यू इंग्लिश शाळा, नाशिक शहर – डी. डी. बिटको हायस्कूल, निफाड – वैनतेय विद्यालय, पेठ – डॉ. विजय बिडकर विद्यालय, सिन्नर – लो. शं. बा. वाजे विद्यालय, सुरगाणा – नूतन विद्यालय, त्र्यंबकेश्वर – नूतन त्र्यंबक विद्यालय, येवला तालुक्यात स्वामी मुक्तानंद विद्यालय यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर व प्रत्येक तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.