लोकसत्ता वार्ताहर

धुळे: जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे १० दरवाजे एका मीटरने उघडण्यात आल्याने तापी नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. तापी नदी धुळे जिल्ह्यातून जात असल्याने जीवित किंवा वित्तहानी होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 

गुरुवारी हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सकाळी पाच वाजता धरणाचे १० दरवाजे प्रत्येकी एका मीटरने उघडण्यात आले. यामुळे १९७७९ क्यूसेस वेगाने विसर्ग तापी नदीपात्रात होत आहे. सद्यस्थितीत सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पाचेही चार दरवाजे अर्धा मीटर उंचीने उघडून ६६६७.८३ क्युसेस इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

हेही वाचा… लाच प्रकरणी महिला तलाठीसह तिघांविरुध्द गुन्हा; धुळे जिल्ह्यातील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाण्याचा वेग लक्षात घेता सुलवाडे प्रकल्पातून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पुढील तीन तासात विसर्ग वाढविण्यात येईल. यामुळे तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये गुरेढोरे सोडू नयते अथवा नदीपात्रामध्ये जाऊ नये, नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.