नाशिक – जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास झाला. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वणी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गणेश बाविस्कर यांचे सराफी दुकान फोडण्यात आले. खाबिया चौकातील बाविस्कर ज्वेलर्स दुकानातील आठ हजार रुपये आणि १५ हजार रुपयांचा लॅपटॉप चोरण्यात आला. दिंडोरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ओम संकट मोचन चैतन्य हनुमान मंदिरात चोरांनी गाभाऱ्याजवळील दोन गज तोडून मंदिरात प्रवेश केला. दानपेटीचा आडवा दरवाजा तोडत २० हजार रुपये लंपास केले.

हेही वाचा – जायकवाडीसाठी विसर्गामुळे शेतीला झळ; गंगापूर धरण जलसाठा ८९ टक्क्यांवर येण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – नाशिक शहरातील १३७ केंद्रांवर मतदार यादीसंबंधी कामावर परिणाम; निवडणूक शाखेच्या आदेशाला बीएलओंकडून आव्हान

तिसरी घटना बागलाण तालुक्यात घडली. कंधाणे येथील विशाल गायकवाड यांचे दुकान, वैभवलक्ष्मी मोबाईल, बी. के. फर्टिलायझर, संतकृपा साडी सेंटर या दुकानांमधून २९,२०० रुपयांचा मुद्देमाल चोरण्यात आला. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.