पंचवटीतील मखमलाबाद जोड रस्त्यावरील तुळजाभवानीनगरातील हमालवाडी परिसरात झालेल्या युवकाच्या मृत्यूची उकल करण्यात पंचवटी पोलिसांना यश आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. दारू पिण्यासाठी पैसे मागण्यावरून वाद झाल्याने संशयितांनी त्याची हत्या केली.

हेही वाचा – “जगातील सर्वात मोठ्या पक्षाला नाशिकमध्ये उमेदवार का मिळाला नाही?”, नाना पटोलेंचा भाजपाला प्रश्न

हेही वाचा – नाशिक : प्रशांत दामले यांना ‘दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट’चा अक्षय्य पुरस्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सातपूर येथे राहणारा ऋषिकेश भालेराव (१९, रा. धर्माजी कॉलनी) हा बेपत्ता असल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. त्याआधारे पोलिसांनी ऋषिकेशच्या मृतदेहाची ओळख पटवली. ऋषिकेश सातपूरहून गावात जात असताना त्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना अशोक स्तंभापर्यंत सोडण्याची विनंती केली. अशोक स्तंभ आल्यावर त्याने उतरण्यास नकार देत पंचवटीत सोडण्यास सांगितले. संशयितांनी त्याला पंचवटीतील हमालवाडी परिसरात सोडले. त्यावेळी ऋषिकेशने दोघांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. शिवीगाळही केली. त्यामुळे संशयितांनी त्याच्या डोक्यात दगड मारून खून केला. संशयितांपैकी एक जण अकरावी कला शाखेत तर दुसरा बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.