लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : पेठ रस्त्यावर भरधाव मालमोटारीने रस्त्याच्या कडेला उभ्या टेम्पोला धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. धडक देणारी मालमोटार अपघातग्रस्तांचा मदतीसाठी न थांबता पसार झाली.

पेठ रस्त्यावरील वेरुळकर यांच्या बंगल्याजवळ रविवारी सायंकाळी सहा वाजता हा अपघात झाला. रस्त्यालगत टेम्पो थांबलेला होता. त्यातून भाजीपाला उतरवून चालक गोवर्धन गोसावी भाड्याचे पैसे घेत होते. याच सुमारास भरधाव आलेल्या मालमोटारीची टेम्पोला धडक बसली. यात गोवर्धन गोसावी (रा. महात्मा फुलेनगर) आणि पांडू ओतार (वडुली, गुजरात) हे दोघे गंभीर जखमी झाले.

आणखी वाचा-दुप्पट नफ्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्यासह अनेकांना दोन कोटीचा गंडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आसपासच्या नागरिकांनी धाव घेऊन संबंधितांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर मालमोटार चालक पळून गेला. याबाबत भाजीपाला व्यावसायिक विनायक पवार यांनी तक्रार दिली. अपघातप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.