धुळे – तालुक्यातील निमडाळे येथील जयहिंद हायस्कूलमधील आठवीतील दोन विद्यार्थ्यांचा खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. गावातील जयहिंद हायस्कूलचे काही विद्यार्थी वन भोजनासाठी गेले असताना ही घटना घडली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

धुळे तालुक्यातील निमडाळे येथील जयहिंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी गावापासून साधारणपणे दोन ते तीन किलोमीटरवरील शिफाई धरण परिसरात वनभोजनासाठी नेण्यात आले होते. यावेळी काही विद्यार्थी जवळच असलेल्या दगड खाणीत साचलेल्या पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने इयत्ता आठवीतील हितेश विजय पाटील-सूर्यवंशी (१४) आणि मयूर वसंत खोंडे (१४) हे दोघे बुडाले. इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यावर त्यांना उपस्थित शिक्षकांनी पाण्याबाहेर काढले.

हेही वाचा – अजित पवार उशीरा आल्याने लाडकी बहीण मेळाव्यास अनुपस्थित

हेही वाचा – Nepal Bus Accident : जळगाव जिल्ह्यातील २४ मृतांची ओळख पटली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोघांनाही धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. मृत हितेश पाटील हा एकूलता होता. मयूर यास एक भाऊ आहे. या घटनेला उपस्थित शिक्षकांना जबाबदार धरले जात असून ग्रामस्थांकडून संबंधित संस्था व कर्मचाऱ्यांच्यावर रोष व्यक्त करण्यात येत आहे.