मनमाड येथून जवळच असलेल्या वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग असतांना केवळ तीनच शिक्षक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभेत निर्णय घेत शाळेला कुलूप लावत आंदोलन केले. शिक्षण विभागाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.

हेही वाचा- “योग्यवेळी मंत्रिमंडळ विस्तार”; अब्दूल सत्तार यांचे संकेत

वंजारवाडी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात सुमारे २३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शाळेत शिक्षकांचे सात पदे मंजूर असतांना केवळ तीनच शिक्षक आहे. हे शिक्षक आपआपल्या परीने पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवून शिक्षण देतात. अनेकदा विद्यार्थ्यांना आपण काय शिकलो हे लक्षात रहात नाही तर अनेकदा शिक्षकांचाही गोंधळ उडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत पालकांनी पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदने दिली. समक्ष भेटून समस्या मांडल्या. मात्र कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. पहिली ते सातवीपर्यंतच्या सात वर्गांचा भार तीन शिक्षकांवर पडतो आहे. आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर लवकरच पंचायत समितीत जाऊन गट शिक्षणाधिकारी यांच्या दालनाच्यापुढे विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

हेही वाचा- जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक मेळाव्यात आमदार चिमणराव पाटील यांची शरद पवारांवर स्तुतिसुमने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वंजारवाडी ग्रामसभेत पालकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले. नंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत निर्णय घेऊन यावेळी उपस्थित असलेले सर्वजण जिल्हा परिषद शाळेवर धडकले. त्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारावरील दरवाजाला कुलूप लावून आंदोलन केले. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शैक्षणिक नुकसान होत असेल तर आम्ही शाळा उघडू देणार नाही. तातडीने प्रशासनाने याची दखल घेऊन चार शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली.