नाशिक : ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले असून फेब्रुवारीतच पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. टंचाईच्या सावटात सापडलेल्या जिल्ह्यातील १४० गावे, २९६ वाड्यांना टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. पुढील काळात टंचाईग्रस्त गावांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. गावांसाठी १७ तर, टँकरसाठी ३३ अशा ४९ विहिरी प्रशासनाने अधिग्रहीत केल्या आहेत.

नांदगाव, येवला, मालेगाव, देवळा, चांदवड, बागलाण आणि सिन्नर या तालुक्यांना टंचाईची झळ बसत आहे. थंडीचा हंगाम निरोप घेण्याच्या मार्गावर असताना ग्रामीण भागात टंचाईची तीव्रता वाढत आहे. अनेक भागातून टँकरची मागणी होत आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात १३३ टँकरद्वारे ४३६ गाव-वाड्यांना टँकरने पाणी पुरवले जात आहे. नांदगाव तालुक्यात ३७ गावे व १६२ वाड्यांना (३५ टँकर), येवला तालुक्यात ३२ गावे व १५ वाडी (२३ टँकर), मालेगाव तालुक्यात १९ गावे व १३ वाडी (३५) देवळा १४ गावे ३३ वाडी (१४ टँकर), चांदवड १८ गावे व ३० वाडी (१९), बागलाण १७ गावे व पाच वाडी (२२), सिन्नर तालुक्यात तीन गावे व ३८ वाडी (नऊ) असे टँकर सुरू आहेत. १३३ टँकरद्वारे दैनंदिन २८६ फेऱ्यांमार्फत उपरोक्त गावांमध्ये पाणी पुरवठा होत आहे.

nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
nashik water crisis marathi news, nashik water scarcity marathi news
नाशिक: प्रचाराच्या धामधुमीत टंचाईचा प्रश्न ऐरणीवर, ६३९ गावे-वाड्यांना टँकरने पाणी
Unseasonal rains in Washim district
वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
domestic gas in Panvel
पनवेलमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार

हेही वाचा…नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर

४९ विहिरी अधिग्रहीत

गावांची तहान भागवण्यासाठी विहिरींचे अधिग्रहण केले जात आहे. गावांसाठी १७ तर, टँकर भरण्यासाठी ३३ अशा एकूण ४९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सर्वाधिक १८ विहिरी मालेगाव तालुक्यात तर, नांदगावमध्ये १४, बागलाण १०, चांदवड एक, देवळा पाच पाच आणि येवला तालुक्यात एका विहिरीचा समावेश आहे.