धुळे-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या नेत्यांविषयी शिवराळ भाषा वापरल्याबद्दल युवासेने तर्फे येथे नितेश राणे यांच्या पुतळ्यास जोडे मारून निषेध करण्यात आला.काही दिवसापासून नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र हे ठाकरे गटाच्या नेत्यांविरुध्द अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करीत असल्याचे युवा सेनेने म्हटले आहे.

उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावरचे आरोप होत असल्याने राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी धुळे जिल्हा युवा सेने तर्फे नितेश राणे यांच्या पुतळ्यास जोडे मारून निषेध करण्यात आला.नितेश राणे यांनी असे वक्तव्य यापुढे केल्यास युवासेना अजून आक्रमकपणे आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा >>>नाशिक: शालिमार परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम, २४ दुकाने जमीनदोस्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युवासेना जिल्हाप्रमुख हरीश माळी,उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे,महानगरप्रमुख मनोज जाधव, धुळे तालुका प्रमुख गणेश चौधरी,धुळे शहर संघटक जितेंद्र पाटील,सोमेश कानकाटे,उपमहानगर प्रमुख जयेश फुलपगारे,समर्थ मुर्तडक आदी युवासैनिक मोठया संख्येने उपस्थित होते