विष्णुदास भावे नाटय़गृहात शनिवारी (ता. ४ जून)कार्यशाळा होणार आहे. शनिवारी होत असलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या उपस्थितीत होईल. या दिवशी समुपदेशक विवेक वेलणकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याचसोबत कार्यक्रमात पुढील वर्षी वैद्यकीय व दंत वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ या पात्रता परीक्षेबाबतही माहिती दिली जाईल. ‘नीट’ची तयारी कशी करायची याबाबत एस. के. सोमय्या महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा. नागेश सावंत विशेष मार्गदर्शन करतील. या वेळी तज्ज्ञांकडून करिअरविषयक नवनव्या संधींविषयी माहिती करून देण्यात येणार आहे. शुक्रवारप्रमाणेच शनिवारचे विषय आणि वक्ते असतील.

‘अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी’ प्रस्तुत आणि ‘विद्यालंकार क्लासेस’च्या सहकार्याने होत असलेल्या या कार्यक्रमाला ‘पॉवर्ड बाय’ आयईईआयटी डिझाइन स्टुडिओ, दिलकॅप महाविद्यालय, रोबोमेट , एलटीए आणि सासमिरा आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.

प्रवेशिका  http://in.bookmyshow.com/mumbai

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अधिक  माहितीसाठी संपर्क- ६७४४०३४७ किंवा ६७४४०३६९.