13 August 2020

News Flash

सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन

आयुष्मान भारत योजनेचा लाभ ८६ लाख नागरिकांना

(संग्रहित छायाचित्र)

देशाच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये बळकटी आणण्यासाठी सार्वजनिक आरोग्याला प्राधान्याने लक्ष देण्याची सर्वच घटकांची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नवीन पनवेल येथे केले.

राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या नवीन संस्थात्मक संकुलाचे उद्घाटन डॉ. हर्षवर्धन यांच्या झाले. कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. आयुष्मान भारत योजनेचा लाभ ८६ लाख नागरिकांना झाल्याचे हर्ष वर्धन यांनी सांगितले.

जून २०१९ मधील स्वच्छता आरोग्य निरीक्षक विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ झाला. नवीन पनवेल येथील राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संकुलामध्ये पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांसाठी दोन पूर्ण-वेळेचे प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये आरोग्य शिक्षण पदविका आणि समुदाय आरोग्य सेवा पदव्युत्तर पदविका  हे दोन प्रशिक्षण अभ्यासक्रम आहेत.

चीनमध्ये करोनामुळे २२०० हून अधिक बळी गेले असले तरी भारताच्या व्यापारावर त्याचा परिणाम झाला नसल्याचा दावा हर्षवर्धन यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2020 1:32 am

Web Title: make public health a priority says dr harsh vardhan abn 97
Next Stories
1 चार मृतदेह दोन महिने बंद घरात
2 महाविकास आघाडी अधांतरी?
3 दिघ्याला २४ तास पाणी कधी?
Just Now!
X