पालिकेचा निर्णय; सात हजार ७१९ वाहनांच्या पार्किंगची सोय 

नवी मुंबई शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे; मात्र अशा शहरात वाहन पार्किंग समस्येने उग्र रूप धारण केले आहे. यापैकी वाहतूक कोंडीची समस्या महत्त्वाची आहे. या अशा वाहनांच्या गर्दीत असलेल्या नवी मुंबईकरांसाठी पालिकेचे फक्त सात वाहनतळ उपलब्ध आहेत. महापालिका क्षेत्रातील वाढती  लोकसंख्या आणि परिणामी शहरातील वाहनांची संख्या वाढत आहे.

या वाहनांमुळे वाहतूक कोंडी उद्भवत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने नवीन ३९ वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच ठाणे—बेलापूर मार्गावर वाहनतळ उभारण्यात येईल.

स्मार्ट सिटीसाठी रस्ते ही महत्त्वाची बाब दुर्लक्षून चालणार नाही. वाहन पार्किंग जागेअभावी पुरविता येत नाही. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडालेला असतो. यामुळे वाहन कोंडी होत आहे.

महापालिकेचा  बेलापूर, वाशी, तुर्भे, नेरुळ आणि ऐरोली अशा  विविध ठिकाणी वाहनतळ  उभारण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता सर्व जागेचे सर्वेक्षण करून वाहनतळ प्रस्तावित करण्यात आले आहेत.

chart

यापैकी ठाणे—बेलापूर मार्गावरील वाहनतळ निविदा प्रक्रियेत आहे. या सर्व वाहनतळावर एकूण ७७१९ वाहनांची क्षमता असणार आहे.

ठाणे—बेलापूर मार्गावर ४५० दुकाचाकी तर १५४ चारचाकी आणि २० ट्रक ची अशा एकूण ६२४ वाहनांची  पार्ची क्षमता असणार आहे. आरसीपी गेट च्या इथे ६ ठिकाणी  तर  डीएकेसी गेट ला ४ ठिकाणी  व  Rोडा येथे वाहनतळ उभारण्यात येणार आहे.

पार्गची समस्या लवकरच मार्गी लागणार आहे. शहराच्या विविध भागात गरजेनुसार वाहनतळ उभारण्याचे प्रस्ताव हाती घेण्यात आले आहेत. येत्या काळात पांगची समस्या उद्भवणार  नाही. विविध सोयींनी उपयुक्त वाहनतळ उभारणायचा आमचा मानस आहे.

अंकुश चव्हाण, अतिरिक आयुक्त नवी मुंबई महानगर पालिका