दीपक शिकारपूर यांचे प्रतिपादन
तंत्रज्ञानामध्ये दररोज बदल होत आहे. दररोज नवनवीन माहिती तयार होत असून आपण कळत नकळत त्या प्रक्रियेत सहभागी होत असतो. त्यामुळे सायबर सुरक्षेबाबतचे नियम नागरिकांनी पाळले पाहिजेत, असे प्रतिपादन आयटी तज्ज्ञ दीपक शिकारपूर यांनी केले. सायबर सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. स्टेट बॅक ऑफ इंडियातर्फे १९ डिसेंबपर्यंत सायबर सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायबर गुन्हेगाराचे सरासरी आयुर्मान १८ ते २० वयोगटातील आहे. शाळा व महाविद्यालयांतून याबाबात जागरूकता होणे गरजेचे आहे. सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे संगणक वापरण्यास सांगितले पाहिजे. सायबर गुन्ह्य़ाची पुढची पायरी सायबर दहशतवाद ही आहे. सर्व दहशतवादी संघटना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करतात. यामुळे पोलिसांनीही सतर्क राहिले पाहिजे. उद्योग जगताने पोलिसांना सहकार्य करण्यासाठी सीएसआर निधीतून यावर खर्च केला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भाई डोळे यांनी सायबर सुरक्षेवर तयार करण्यात आलेल्या सीडीचे या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले. या सीडीच्या माध्यामातून सायबर सुरक्षाविषयी जनजागृती केली जाणार आहे.
इंटरनेटचे माध्यम सोयीस्कर असले तरी यामुळे सायबर गुन्ह्य़ांमध्ये वाढ होत असल्याचे नवी मुंबई आयुक्त प्रभांत रंजन यांनी सांगितले. या सप्ताहामध्ये डाटा सेक्युरिटी, डिजिटल प्रायव्हसी, बँकिंग अॅण्ड फायनान्शिअल क्राइम, सोशल नेटवìकग आदी विषयांवर तज्ज्ञांकडून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेविषयी माहिती दिली जाणार आहे. या कार्यक्रमास अप्पर पोलीस आयुक्त विजय चव्हाण, पोलीस उपआयुक्त दिलीप सावंत, पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे, शहाजी उमाप, विश्वास पांढरे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सीजीएम दीपांकर आदी उपस्थित होते.