पनवेल : पनवेल महापालिकेच्या आकृतीबंधानूसार ४२ विविध पदांसाठी ३७७ जागांवर मेगा पदभरती होत आहे. १५ सप्टेंबर ही भरती प्रक्रीयेच्या अर्ज नोंदणीसाठी शेवटची तारीख असल्याने आतापर्यंत एक लाख १५ हजार उमेदवारांनी अर्जनोंदणी केली आहे. तसेच यापैकी ४८ हजार ५०० उमेदवारांनी कागदपत्रांसह पुर्ण अर्ज संकेतस्थळावर जमा केले आहेत. पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी भरती प्रक्रीया पारदर्शक होत असल्याचे आवाहन करताना भरती प्रक्रियेबाबत अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी अप्रत्यक्षपणे प्रलोभन दाखविल्यास त्या विरोधात उमेदवारांनी पोलीस स्थानकात रीतसर तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : एपीएमसीत हिरवा वाटाणा वधारला आवक घटल्याने १० रुपयांनी दरवाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पनवेल पालिकेच्या भरती प्रक्रीयेत प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधि, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यानसेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखा परीक्षण सेवा इत्यादी विभागांतील पदांकरिता ही भरती होत आहे. इच्छुकांना http://www.panvelcorporation.comhttps://mahadma.maharashtra.gov.inhttps://mahadma. या संकेतस्थळांवर अर्ज करता येईल. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. महानगरपालिकेची भरती प्रक्रिया संबंधात उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी पालिकेने तक्रार निवारण कक्ष स्थापन केला असून भरती प्रक्रिये संदर्भात शंका असल्यास ०२२-२७४५८०४२, २७४५८०४१ या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन मुख्यालय उपायुक्त कैलास गावडे यांनी केले आहे.