नवी मुंबई : महापालिकेकडून गेली दोन वर्षे सातत्याने कचरा वाहतूक व संकलन कामाला मुदतवाढ दिली जात होती. परंतु २६ जानेवारी २०२५ पासून बहुचर्चित ९३४ कोटी खर्चाच्या कचरा वाहतूक व संकलन कामाचा श्रीगणेशा झाल्यानंतर या नव्या कामाच्या कार्यादेशानुसार कामाला सुरुवात केली आहे. ठेकेदाराकडून शहरात एकूण २४ हजार कचराकुंड्यांचे वाटप या महिनाअखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.

दिघा व कोपरखैरणे विभागातून ओला व सुका कचऱ्याच्या कचराकुंड्या वाटपाला सुरुवात झाली आहे. पालिका इतिहासात प्रथमच ई कचरा वाहतुकीचाही श्रीगणेशा झाला आहे. शहरात ४० ई वाहनांच्याद्वारे कचरा संकलन करण्यात येत आहे. पालिकेने शहर स्वच्छतेबरोबरच कचरा वर्गीकरणाकडे पालिकेने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. नवी मुंबई महापालिकेने कचरा वाहतूक व संकलनासाठी मार्च २०१५ ते मार्च २०२२ पर्यंत शहरातील कचरा वाहतूक व संकलनाच्या ठेकेदाराला काम दिले होते. आता नव्या ठेकेदाराला नऊ वर्षांचा ठेका देण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेच्यावतीने नव्या निविदेत कचरा वर्गीकरणाची व्याप्तीही वाढवली आहे. विविध पध्दतीचा कचरा वेगळा करण्याचे लक्ष्य आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन कचरा संकलन ठेक्याच्या निविदेनुसार शहरातील सोसायट्यांना ओला व सुका कचरा संकलन करण्यासाठी ठेकेदाराकडून २४ हजार कुंड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. जुलै महिनाअखेरपर्यंत हे वाटप पूर्ण करण्यात येणार आहे. नागरिकांनीही स्वच्छतेबाबत व कचरा संकलनाबाबत योग्य ती काळजी घ्यावी. डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका