नवी मुंबई : वाशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी भाजीपाल्याच्या तब्बल ७०० गाड्या दाखल झाल्या. वातावरणातील उष्म्याने आठ दिवस आधीच उत्पादन निघाल्याने ही आवक वाढली आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. त्यामुळे काही भाज्यांचे दर उतरले आहेत तर काही भाज्या मात्र महागच आहेत.

गुरुवारी घाऊक भाजीपाला बाजारात एकूण ७००गाड्या दाखल झाल्या होत्या, यामध्ये पालेभाज्यांची २०० गाड्या आवक झाली. एरव्ही बाजारात ५५० ते ६०० गाड्या दाखल होतात. मागील आठवड्यात गारठा वाढला होता, परंतु पुन्हा आता ढगाळ वातावरण आणि उष्मा वाढला आहे. त्यामुळे भाज्यांचे उत्पादन लवकर निघत आहे. परिणामी बाजारात आवक वाढली आहे. काही भाज्यांच्या दरात प्रतिकिलो ५-६ रुपयांची घसरण झाली आहे, मात्र बहुतांश भाज्यांचे दर चढेच आहेत. घाऊकमध्ये प्रतिकिलो टोमॅटो ४० रु., शिमला मिरची ४०रुपये, हिरवी मिरची २०-३०रुपये, कोबी१६-२०रुपये, फ्लावर १०रुपये, भेंडी ४०-५०रुपये ,फरसबी ४०रुपयांनी विक्री होत आहे.

हेही वाचा…धूळधाण पुनर्विकास इमारतींमुळे ऐन थंडीतही शहरात धुळीचे साम्राज्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालेभाज्या, कोथिंबीर स्वस्त

वाशीतील एपीएमसी भाजीपाला बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली आहे. तापमान वाढल्याने उत्पादन जास्त होत आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात भाज्या दाखल होत असून जुडी ५-७रुपयांनी विक्री होत आहेत. पुणे आणि नाशिक येथून येणाऱ्या मेथीला कमीत कमी ५ आणि जास्तीत जास्त ८ रुपये बाजारभाव आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाव कमी झाले आहेत. या आधी १५-२० रुपये दराने एक जुडी मिळत होती. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिर, पालक आणि मेथीची आवक वाढत असून २,५५,००० क्विंटल कोथिंबीर दाखल झाली असून प्रतिजुडी ५-८ रुपयांनी उपलब्ध आहे.