अमेरिकेतून आणलेल्या आयात मालाच्या कंटेनरमध्ये ब्लॅक – ईगवाना या प्रजातीचा प्राणी आढळून आला. ब्लॅक – ईगवानाला उरणमधील प्राणीमित्रांनी जीवनदान दिले. हा प्राणी पालीच्या प्रजातीत मोडत असून त्याचा आकार काळ्या रंगाचा असतो आणि तो पालीपेक्षा आकाराने मोठा असतो. वनविभागाच्या मदतीने त्याला उपचारासाठी आणि निरीक्षणासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : एपीएमसीतील आगीच्या घटनेबाबतचा अहवाल सादर करण्यास विलंब?

कोप्रोली येथील ग्लोबीकॉन या गोदमातून वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या अध्यक्ष विवेक केणी यांना एक कॉल आला की एका कंटेनरमध्ये साप शिरला आहे. केणी त्यांचे सहकारी शिवप्रसाद भेंडे यांना घेऊन घटनास्थळी पोहचले. त्यावेळी कंटेनर उघडून पहिला असता. एका पालीसारखा पण मोठा प्राणी दिसला. त्या प्राण्याला पहिल्यानंतर काही समजून येत नव्हते. सर्प मित्र यांच्या म्हणण्यानुसार त्या प्राण्यासरखा दुसरा प्राणी आपल्या परिसरात सापडतच नाही.

हेही वाचा- नवी मुंबई: तुर्भेतून २ टनांहून अधिक प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथील कस्टम हाऊस एजंट हा कंटेनर यूएसए मधून आल्याचे सांगण्यात आल्यावर हा प्राणी ब्लॅक इग्वांना .( Black iguana or black spiny-tailed iguana) (Ctenosaura Similes) असल्याची शहानिशा झाली. हा प्राणी आपल्या भारतात सापडत नाही. त्या प्राण्याला कंटेनरमधून शिताफीने पकडून त्वरित वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्यामार्फत वनपरीक्षेत्र उरण विभाग यांच्याकडे सुरक्षित पोहच केले. वनविभागाने त्यांनी त्याला उपचार आणि निरीक्षणासाठी पुण्याच्या रिसर्च सेंटरकडे पाठविले आहे. या आगोदर ही असाच कंटेनरमधून अफ्रिकेतून spitting cobra, green Mamba आले आहेत.