नवी मुंबई: गावाहून आलेल्या आपल्या भावास घरी घेऊन येण्यासाठी बहीण गेली. मात्र घरी येऊन पाहताच दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोराने घरात प्रवेश करीत  ४ लाख ५५ हजार ६४१ रुपयांचा ऐवज चोरी केला होता. याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

छाया देसाई या कोपरखैरणे  सेक्टर १२ येथे पती, मुलगा आणि सुने समवेत राहतात. पती कुर्ला येथे नोकरी करतात तसेच मुलगा आणि सून दोघेही नोकरी करीत असल्याने दिवसभर छाया घरीच असतात. याच परिसरात त्यांचा भाचा राहतो. ३० तारखेला त्यांचा भाऊ मूळ गावाहून आपल्या मुलाकडे आला. याच भावाला घरी घेऊन येण्यासाठी म्हणून छाया या सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर पडल्या. तर सहाच्या सुमारास भावाला घेऊन घरी आल्या. त्याच वेळेस दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत होता तर आतील सर्व सामान विस्कटलेले होते. तसेच कपाट  उघडलेले दिसले.

हेही वाचा… मच्छिमारांचे २०२१ पासूनचे २५ कोटींचे डिझेल परतावे (अनुदान) थकीत; मच्छिमार आर्थिक संकटात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहणी केली असता घरात असलेले मंगळसूत्र, सोन्याचा हार, सोन्याचे पेंडंट, पान, डूल असा एकूण चार लाख ५५ हजार ६४१ रुपयांचा ऐवज चोरी झालेला होता. याबाबत शुक्रवारी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.