नवी मुंबई : नवी मुंबईतील सिवूड्स येथे मनपाच्या स्थापत्य विभागाच्या कामाच्या आढाव्यादरम्यान कनिष्ठ अभियंत्याला अर्वाच्च शिवीगाळ करणे, अरेरावीचे बोलणे मनसे अध्यक्ष गजानन काळे यांच्या अंगलट आले आहे. त्यांच्या विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

७ तारखेला नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे यांनी सिवूड्स परिसरात रस्ते काम पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी रस्त्यावर काम नियमांना धरून केले जात नाही, धूळ मोठ्या प्रमाणावर होत आहे, प्रदूषण नियंत्रण नियमांची पायमल्ली होत आहे, कामाचा दर्जा चांगला नाही असे अनेक आरोप काळे यांनी केले. मात्र या दरम्यान त्यांनी कनिष्ठ अभियंता व कंत्राटदार कामगार यांना अर्वाच्च भाषेत बोलून शिवीगाळ केली होती. याची दखल घेत कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी गजानन काळे यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून एनआरआय पोलिसांनी काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

sex racket busted at unisex salon prostitution in guise of a unisex salon
युनिसेक्स सलूनच्या आड देहव्यापार – विवाहित महिलेची….
Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास
mns trade union vice president raj parte attacked attacked with Rods and knife
मनसे कामगार सेनेच्या अंतर्गत वादातून उपाध्यक्षावर चाकू व रॉडने हल्ला; दोन पदाधिकाऱ्यांसह १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा

हेही वाचा – नामांकित खाद्य पदार्थांच्या वेष्टनावर खाडाखोड करून विदेशात  विक्री, अन्न औषध प्रशासनाची कारवाई

हेही वाचा – पनवेल : खारघरमध्ये ‘हायवे ब्रेक’ हॉटेलला भीषण आग

७ तारखेला काळे यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान जी शिवीगाळ केली त्या विरोधात दुसऱ्या दिवशी यांच्या कार्यालयावर स्व. दि बा पाटील ठेकेदार संघटनेने आंदोलन केले होते. त्यावेळी काळे यांनी झालेल्या प्रकरविरोधात दिलगिरी व्यक्त केली होती. वास्तविक त्याच ठिकाणी वाद मिटला होता. मात्र त्याच दिवशी दुपारनंतर काळे यांनी शहर अभियंता संजय देसाई यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. कंत्राटदारांच्या तक्रारींचा पाढा वाढला. त्यामुळे प्रकरण जास्त चिघळले. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणून ९ तारखेला मनपा कर्मचारी संघटनेने काळे यांच्या या कृतीचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून काम केले. दादागिरी झुंडशाही नाही चालणार अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिल्या. कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेत कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गजानन काळे आणि अमोल आयवळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.