नवी मुंबईतील माजी नगरसेवकासह इतर सहा जणांवर रबाळे पोलीस ठाण्यात फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नवीन गवते असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवी मुंबई: गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने एसएससी सराव परीक्षा उपक्रमाचा शुभारंभ

या प्रकरणातील पिडीत अभंग शिंदे हे दिघा येथील श्रीकृष्ण विहार अपार्टमेंटमध्ये राहतात. २०१२ मध्ये चाळीचे पुनर्वसन करुन तेथे श्री गणेश बिल्डर्स अॅण्ड डेव्हेलोपर्स या विकसकाने श्रीकृष्ठ विहार अपार्टमेंट ही इमारत बांधली. या इमारतीमधील सदनिका क्रमांक ४०५ व ५०६ याचे कोणतेही कागदपत्र अभंग यांना न देता तसेच ४०५ सदनिकेचे विजेचे देयक अभंग यांच्या नावावर असतानाही संशयित आरोपी प्रकाश पाते याने ऐरोली येथील वीज महावितरण कार्यालयाकडून थेट खोटी कागदपत्राच्या आधारे २२ जून रोजी पुन्हा श्री गणेश बिल्डर्स यांच्या नावाने विजेचे देयक केले. याबाबत अभंग शिंदे यांनी पोलिसांत तक्रार केली होती. याचाच राग मनात ठेऊन नवीन गवते यांच्यासह चंद्रम सोनकांबळे, दामोदर कोटीयन, प्रकाश पाते, विरेश सिंग यांनी शिंदे यांना सप्टेंबर महिन्यात शिवीगाळ व दमदाटी केली होती. याबाबत शिंदे यांनी ठाणे येथील न्यायालयात धाव घेतली. जिल्हा अतिरीक्त सत्र न्यायाधीशांच्या सूचनेवरुन सीआरपीसी कलम १५६ (३) प्रमाणे गुन्हा नोंदविण्याचे आदेश न्यायालयाने रबाळे पोलिसांना दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी माजी नगरसेवकांसह इतर समाजसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case of fraud and caste abuse has been registered against a former corporator in navi mumbai dpj
First published on: 03-12-2022 at 23:11 IST