लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संदीप संकपाळ या सामाजिक कार्यकर्त्यांने पर्यावरण रक्षणासाठी सायकलवरून येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. अनोख्या पद्धतीने पर्यावरण प्रेमी कार्यकर्त्यांने दाखल केलेला हा अर्ज चर्चेचा विषय बनला.

लोकसभा निवडणुकीमध्ये ठराविक मुद्द्यांवर चर्चा होत असताना सामाजिक कार्यकर्ते संदीप गुंडोपंत संकपाळ यांनी पर्यावरण रचनाचा मुद्दा घेऊन ती लढवण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी आज त्यांनी सायकलवरून येऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांची ही भूमिका चर्चेचा विषय बनली आहे.

आणखी वाचा-हातकणंगलेत आणखी एका शेतकरी नेत्याचा अर्ज दाखल; रघुनाथदादा पाटील रिंगणात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा, विधानसभेवेळीही दंड थोपटलेले

केश कर्तनालयाचा व्यवसाय उचगाव भागात चालवणारे संकपाळ यांनी याआधी गेल्या दोन लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. २०१४ मध्ये त्यांनी दहा हजाराहून अधिक मते घेतल्यापासून ते चर्चेत आले आहेत. खेरीज त्यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून एकदा शड्डू ठोकला होता. शाहू महाराज व खासदार संजय मंडलिक यांच्या सामना रंगत असताना संकपाळ या पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्याला कोणता प्रतिसाद मिळतो हे लक्षवेधी ठरले आहे.