वाशी खाडीत अवैधरित्या राखीव कांदळवनाच्या जागेत खारफुटीचीची कत्तल करून त्याजागी अवैध खेकडा पालन तसेच झोपड्या बांधून त्या भाड्यावर दिल्या प्रकरणी वन विभागाच्या वतीने १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई शहराला विस्तीर्ण असा खाडी किनारा लाभला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवन खारफुटी आहे. मात्र काही भूमाफियांकडून अशा खारफुटीवर राडारोडा टाकून खारफुटीची सर्रास कत्तल केली जात आहे. तसेच डेब्रिज टाकल्यानंतर त्या ठिकाणी झोपड्या बांधून भाड्यावर दिल्या जात आहेत. काही स्थानिकांकडून विना परवाना मत्स,खेकडा पालन केले जात आहे.

हेही वाचा: नवी मुंबईमध्ये गोवरचे २४ रुग्ण; शहराला धोका नसल्याची महापालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाशी खाडीत सर्व्हे क्रमांक १७ वर अशाच प्रकारे खारफुटीची कत्तल करून झोपड्यांचे साम्राज्य उभे केले होते. याबाबत वन विभागाकडे तक्रारी आल्या होत्या.या तक्रारीनुसार राखीव कांदळवन क्षेत्रात वृक्षांची मोठया प्रमाणात कत्तल करून तेथे डेब्रीजचा भराव टाकून, झोपडया उभारून त्यामध्ये राहणाऱ्या झोपडीधारकांकडून अवैधरित्या पैसे वसूल करणे, कांदळवनात राडारोडा टाकून कांदळवनाची कत्तल करणे, विनापरवाना खेकडा व मासेमारी करणे या प्रकरणी वन विभागामार्फत १० जणांविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. तसेच येथील ५० झोपड्यांवर कारवाई करण्यात आली आहे.