पनवेल : खारघर वसाहतीमध्ये काही दिवसांपूर्वी सोनेरी कोल्हा नागरिकांना दिसला होता. टाकाऊ रसायनांची वाहिनी थेट खाडीत खोल सोडण्यासाठी रोडपाली ते खारघर या पल्यातील खाडीक्षेत्र बुजविले गेले, त्यामुळे अनेक जलचर भूकेमुळे आणि त्यांच्या वास्तव्यामुळे पाण्यातून बाहेर पडले. हा कोल्हा त्यापैकीच होता असे मत येथील स्थानिकांनी व्यक्त केले.

सोमवारी सकाळी खारघर येथील सेक्टर १६ मध्ये मृतावस्थेमध्ये सोनेरी कोल्हा आढळल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. सोमवारी मृतावस्थेमधील कोल्ह्याचे अवशेष घेऊन त्याचे विच्छेदन पनवेल येथील पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केल्याची माहिती पनवेलचे परिक्षेत्र वन अधिकारी ज्ञानेश्वर सोनावणे यांनी सांगितली. लवकरच मृतावस्थेमधील कोल्ह्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यावर यावर अधिक भाष्य करता येईल असेही अधिकारी सोनावणे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…

मृतावस्थेमधील कोल्हा व खारघरच्या नागरिकांनी पाहिलेला कोल्हा हा एकच आहे का याविषयी अद्याप तरी स्पष्टपणे सांगू शकत नसल्याचे वन विभागाचे अधिकारी सोनावणे म्हणाले. खारघर वसाहतीलगतची खारफुटी नष्ट होत चालली आहे. पर्यावरणवादी संघटनेचे बी.एन. कुमार यांनी संबंधित सोनेरी कोल्ह्याचा मृत्यू हा मानव-वन्यजीव संघर्षाचे उदाहरण असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

हेही वाचा – सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे भाजपला आव्हान, संघर्ष हाणामारीपर्यंत

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) रोडपाली ते खारघर या क्षेत्रातील खाडी सूकवून त्यावर तात्पुरता मातीचा भराव टाकून खाडीक्षेत्र सूकवून त्यामध्ये सुरुंग स्फोट करुन वाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी या कामाला पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली असून काम पूर्ण झाल्यानंतर खाडीक्षेत्रातील भराव काढून घेतला जाईल असे, स्पष्टीकरण दिले. मात्र काम पूर्ण होईपर्यंत पाण्यातील जलचरांचे काय यावर सरकारी अधिकारी निरुत्तर आहेत.

हेही वाचा – सिडको बाधित भूमीपुत्रांच्या मागण्यांसाठी शासनाला साकडे , मुंबईच्या आझाद मैदानात मागण्यांसाठी एल्गार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खारघर, तळोजा, नावडे, कोपरा या परिसरात मोठे पाणथळ, खारफुटी व कांदळवन क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या रक्षणासाठी सरकारने कोकण विभागीय आयुक्तांच्या देखरेखीखाली समिती स्थापन केली तरीही वन्यजिवांची सूरक्षा वाऱ्यावर आहे.