A married woman who went to fetch milk committed suicide by jumping into the creek in Ulva area navi mumbai | Loksatta

नवी मुंबई: दूध आणायला गेलेल्या विवाहितेची खाडीत उडी मारुन आत्महत्या

नैराश्यापोटी विवाहितेने आत्महत्या केल्याचा अंदाज

नवी मुंबई: दूध आणायला गेलेल्या विवाहितेची खाडीत उडी मारुन आत्महत्या
प्रातिनिधिक छायाचित्र

नवी मुंबईतील उलवा परिसरात एका महिलेने नैराश्यापोटी आत्म्हत्येसारखे टोकाचे पाउल उचलले. अनामिक काळजी आणि नैराश्यापोटी आत्महत्या केली असा प्रार्थमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरती परब असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

हेही वाचा- वैद्यकीय महाविद्यालय भूखंड प्रकरणी भाजप आमदार मंदा म्हात्रेंचे आंदोलन रद्द

उलवा परिसरात आरती परब या आपल्या कुटुंबीयांसमवेत राहत होत्या. घरात कुठलीही समस्या नव्हती मात्र अनामिक भीती पोटी आलेल्या नैराश्याने त्यांनी खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी घडली. आरती यांचे पती नोकरीच्या ठिकाणी सकाळी निघून गेल्यानंतर आरती यांनी त्यांचे बाळ घरातच ठेवत दूध आणण्यास जाते असे सासूला सांगून बाहेर पडल्या. मात्र खूप वेळ झाला तरी त्या घरी न आल्याने सासूने आरतीला फोन लावला. मात्र, संपर्क न झाल्याने सासूने आपल्या मुलास म्हणजे आरती यांच्या पतीस फोनवर ही माहिती दिली. त्यांनी तत्काळ घर गाठत आरती कुठे कुठे जाऊ शकतात या अंदाजाने त्यांचा शोध घेतला. मात्र, त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. म्हणून संध्याकाळी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्यावर आरती यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले.

हेही वाचा- निसर्ग उद्यानात ९५०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी चितारले स्वच्छ नवी मुंबईचे चित्र

दरम्यान सकाळी १२ च्या सुमारास उलवा परिसरात असणाऱ्या नागेश्वर मंदिर जेट्टी खाडीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेत पुढील तपासणी साठी वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल केला होता त्यावेळी मृतदेहाची ओळख पटली नव्हती मात्र जेव्हां आरती बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यास त्यांचे पती आले त्यावेळी त्यांना आत्महत्या केलेल्या महिलेचा फोटो दाखवल्यावर मृतदेहाची ओळख पटली. सध्या याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे अशी माहिती एनआरआय पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 16:04 IST
Next Story
नवी मुंबई: देवगड हापूसची पहिली पेटी एपीएमसीत दाखल