पनवेल : अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट रचणे आणि त्यासाठी पाकीस्तानी शस्त्र तस्कराची मदत घेतल्याप्रकरणी चौघा संशयीतांना पकडल्याची माहिती पत्रकार परिषदेत पनवेल येथे दिली. अद्याप सलमानच्या मारेकऱ्यांच्या टोळीतील २० हून अधिक संशयीत फरार असल्याने सलमान खानच्या जिवाचा धोका अद्याप टळला नसल्याची बाब पत्रकार घेऊन पोलीसांनी स्पष्ट केली. नवी मुंबई पोलीस दलाचे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिलेल्या माहितीनूसार पकडलेल्या संशयीतांकडे अनेक धक्कादायक माहिती समोर आली. सलमानच्या मुंबईतील बांद्रा येथील घरी आणि पनवेल येथील शेतघरावर या टोळीतील सदस्यांनी टेहळणी करुन त्याला मारण्यासाठी पाकीस्तान येथून शस्त्र खरेदी करण्याचा कट रचला होता.

हेही वाचा >>> २० अवैध फलकांचे पनवेलमध्ये पाडकाम सुरू

सलमानला घरावरील हल्यानंतर राज्य सरकारने सलमानला विशेष सूरक्षा पुरविली आहे. त्याचसोबत तो ज्या ठिकाणी जातो तेथील स्थानिक पोलीस तेथे तैनात केले जातात. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीसांच्या पथकाने संशयीतांचे मोबाईल फोन टॅप करायला सूरु केले. पोलीसांना या फोन टॅपींगमध्ये महत्वाचे धागेदोरे हाती लागले. लॉरेंस बिश्णेई आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळीसोबत थेट संपर्कात असलेला २८ वर्षीय अजय कश्यप उर्फ धनंजय तपेसिंग हा मुख्य मध्यस्थी सापडला. गोल्डी हा कॅनडाहून टोळी चालवित असून पाकीस्तान येथील डोगर नावाचा शस्त्र तस्कराच्या संपर्कात हे सारेजण असल्याचे उघड झाले. अजय हा मागील अनेक महिन्यांपासून पनवेल येथील खिडुकपाडा गावात राहत होता. २० वेगवेगळ्या मोबाईल नंबरचे सीमकार्ड अजय वापरत असल्याचे पोलीसांच्या तपासाता उघड झाले. अजयने सलमानला मारल्यानंतर कन्याकुमारी मार्गे सर्वांनी श्रीलंकेत कसे जावे याचेही नियोजन केले होते. सलमानची हत्या हा एकमेव हेतू या सर्वांचा होता.

हेही वाचा >>> पनवेल : आपत्तीवर मात करण्यासाठी सिडकोचे आपत्कालिन कक्ष सज्ज

सलमानच्या हत्येनंतर मोठी रक्कम या सा-यांना मिळणार होती. कायद्याचा ससेमीरा संशयीतांच्या मागे लागू नये यासाठी १८ वर्षांखालील वयाच्या मुलांकडून हत्या करण्याचा यांचा कट होता. अजयसोबत २९ वर्षीय गौरव भाटीया उर्फ संदीप बिष्णोई, ३६ वर्षीय वस्पी मोहम्मद उर्फ वसीम चिकना, झीशान झकरुल हसन उर्फ जावेद खान अशी पोलीसांनी अटक केलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त पानसरे यांनी दिलेल्या माहितीनूसार अजयला पनवेलमधून, संदीपला गुजरात येथून, वस्पी याला छत्रपती संभाजीनंगर येथून आणि जावेदला बंगळुरु कर्नाटक येथून पोलीसांच्या पथकाने ताब्यात घेतल्याचे उपायुक्त पानसरे म्हणाले. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून ते आतापर्यंत पनवेल शहर पोलीसांचे १० कर्मचारी व दोन पोलीस अधिकारी या महत्वाच्या प्रकरणाचा तपास लावत आहेत. सलमानच्या हत्येच्या कटात पाकीस्तानी शस्त्र तस्कर डोगर, लॉरेन्स व अनमोल बिश्णोई या टोळीसह कॅनडातील गोल्डी ब्रार टोळी, आनंदपालची मुलगी चिनू हीची टोळी सुद्धा सक्रीय आहे. तसेच सूखा शूटर, संपत नेहरा या मंडळीसह ७० तरुण मुलांसह १८ वर्षांखालील ४० हून अधिक मुले सक्रीय आहेत. सलमानला मारण्यासाठी पाकीस्तानहून तस्करीकरुन एके ४७, एम १६, एके ९२ अशी हत्यांची तजवीज करण्यासाठी पैसे पाठविण्याचे काम ही मंडळी करणार होती. पोलीसांनी अनुचित प्रकार घडण्यापूर्वी मारेक-यांचा कट उध्वस्त केला. नितिन ठाकरे, पोलीस निरिक्षक अंजुम बागवान, प्रविण भगत, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश पवार, बजरंग राजपूत, पोलीस उपनिरिक्षक विनोद लभडे, अभयसिंह शिंदे, हवालदार अविनाश गंथडे, यशवंत झाजम, नितिन वाघमारे, महेंद्र वायकर, परेष म्हात्रे, अमोल पाटील, पोलीस नाईक संजय सावंत, विनोद देशमुख, रविंद्र पारधी, पोलीस शिपाई प्रसाद घरत, किरण सराड, साईनाथ मोकल, अभय मे-या, विशाल दुधे यांनी खडतर परिश्रम घेतले. तसेच या प्रकरणात तांत्रिक तपास करणा-या टिमची उल्लेखनीय कामगिरी असल्याचे पोलीस उपायुक्त पानसरे म्हणाले. यामध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश माने, हवालदाल वैभव शिंदे, शिपाई प्रविण पाटील यांनीही मेहनत घेतली.