दारूचे व्यसन नडले, उच्च दाबाच्या विद्युत खांबाला दोरी बांधून तरूणाची आत्महत्या|addicted alcohol young man committed suicide by high voltage electric pole crime police navi mumbai | Loksatta

दारूचे व्यसन नडले, उच्च दाबाच्या विद्युत खांबाला दोरी बांधून तरूणाची आत्महत्या

किरण हा तुर्भे स्टोअर येथे राहत असून बेलापूरला एका बँकेत हाऊस किपिंगचे काम करतो.

दारूचे व्यसन नडले, उच्च दाबाच्या विद्युत खांबाला दोरी बांधून तरूणाची आत्महत्या
प्रातिनिधिक छायाचित्र

नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे स्टोअर भागात भर रस्त्यात एका उच्च दाब विद्युत खांबांवर मृतदेह लटकलेला पाहून एकच खळबळ उडाली. या युवकाने गळफास घेत आत्महत्या केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. किरण घाडगे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. किरण हा तुर्भे स्टोअर येथे राहत असून बेलापूरला एका बँकेत हाऊस किपिंगचे काम करतो. त्याला दारूचे व्यसन असून रोज रात्री मद्य प्राशन केल्यावर कुठे ना कुठे झोपतो आणि जेव्हा जाग येईल तेव्हा घरी जातो.

हेही वाचा: नवी मुंबई: वाहनचालकांचे वेगावर नियंत्रण राहण्यासाठी महापालिकेने लढवली अनोखी शक्कल

मात्र तो सोमवारी घरी न आल्याने त्याच्या आईने त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. याच परिसरात दुर्गामाता मंदिर परिसर असून येथेच अनेकदा तो सापडतो म्हणून आईने त्या ठिकाणी शोधाशोध केली असता सकाळी सातच्या सुमारास तिला किरण हा उच्च दाब विद्युत खांबा क्रमांक दोनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या ठिकाणी गर्दीही जमली होती. या घटनेची माहिती मिळताच तुर्भे पोलिसांनी मृतदेह काढून पुढील तपासणीसाठी महानगरपालिका रुग्णालयात दाखल केला अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 10:42 IST
Next Story
नवी मुंबई: वाहनचालकांचे वेगावर नियंत्रण राहण्यासाठी महापालिकेने लढवली अनोखी शक्कल